परतवाड्यात साचलेल्या पाण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:30+5:302021-07-16T04:10:30+5:30
डेंग्यूच्या प्रश्नावर नगरपालिका ‘ॲक्शन मोड’मध्ये, भाजपा आक्रमक फोटो - ओ १५ बीजेपी परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात डेंग्यूचा वाढता ...
डेंग्यूच्या प्रश्नावर नगरपालिका ‘ॲक्शन मोड’मध्ये, भाजपा आक्रमक
फोटो - ओ १५ बीजेपी
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात डेंग्यूचा वाढता प्रभाव बघता, नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या निर्देशानुसार ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळतात, त्या ठिकाणी फवारणीसह स्वच्छतेच्या उपायोजना नगरपालिकेकडून केल्या जात आहेत. दुसरीकडे या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे.
नगरपालिकेने साचलेले पाणी काढून वाढत्या डासांचा बंदोबस्त करण्याकरिता विशेष मोहीम हाती घेतली आहे. नगरपालिकेने याकरिता स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक गठित केले आहे. शहरातील वाढत्या डेंग्यू आजाराच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष आक्रमक झाली आहे. यात नगरपालिका क्षेत्रात परिणामकारक फवारणी नियमित करण्यात यावी, पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवरील लीकेज दुरुस्त करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन १३ जुलैला भाजपाच्यावतीने नगरपालिका प्रशासनास देण्यात आले. याप्रसंगी नगरपालिकेचे उपाध्यक्ष शशिकांत जयस्वाल, नगरसेवक अक्षरा लहाने व मनोज जामनेकर, गजानन कोल्हे, अभय माथने, सुमीत चौधरी, प्रवीण तोंडगावकर, नितीन डकरे, महेश कडू, विक्की गुप्ता, रूपेश लहाने, योगेश थोरात, आशिष मानमोडे, गौरव बोंडे, मनीष लाडोळे, गौरव गायकवाड, नीलेश पोटे, शंकर बाचानी, उमेश पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, नागरिकांनीसुद्धा दक्ष राहावे, याकरिता नगरपालिकेकडून घरोघरी माहितीपत्रक वितरित केल्या जात आहे. कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांसोबत ही पत्रके घरोघरी पोहोचत आहेत. यात डेंग्यूच्या अनुषंगाने रोगाची माहिती, या रोगांची लक्षणे व पाळावयाच्या उपायोजना याविषयी माहिती दिली आहे.