श्रीनिवास रेड्डीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:29+5:302021-08-20T04:17:29+5:30
पत्रपरिषदेत बेलदार समाजाची माहिती, वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी रेड्डी देषीच अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी ...
पत्रपरिषदेत बेलदार समाजाची माहिती, वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी रेड्डी देषीच
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर धारणी पोलिसात दाखल गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केले. या निर्णयाविरूद्ध लवकरच सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू साळुंके यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली.
दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च २०२० रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी रिव्हाल्व्हरने गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी प्रमख आरोपी म्हणून निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व सहआरोपी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर आत्महत्याप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र, श्रीनिवास रेड्डी यांनी धारणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार रेड्डी यांच्यावर दीपाली आत्महत्याप्रकरणी दाखल गुन्हे खारीज करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे. या निर्णयाचा बेलदार समाज संघटनेने आदर केला असून, त्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विनोद शिवकुमार एवढाच श्रीनिवास रेड्डी सुद्धा दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात
आला आहे. श्रीनिवास रेडडी यांच्या बेहिशीबी मालत्तेची चौकशी सीबीआय मार्फत करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे निवेदनाद्धारे करण्यात येणार आहे. श्रनिवास रेड्डी यांना महाराष्ट्रात नियुक्ती देऊ नये, अन्य राज्यात त्यांना सेवा बजाविण्यासाठी नियुक्ती करावे, अशी मागणी केली जाणार आहे. ओबीसीमध्ये बेलदार समाजाला आरक्षण मिळावे, सोयी-सुविधांना लाभ मिळावा, शासकीय जमिनीवर बेलदार समाजाची घरे कायम करण्यात यावी, घरकूल योजनेचा लाभ मिळावा. आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे राजू सोळुंके यांनी सांगितले. यावेळी संजीव जाधव, अंकुश पवार, विलास चव्हाण, सुरेश पवार, सुरेश जाधव, नंदकिशोर पवार, शशी पवार आदी उपस्थित होते.