श्रीक्षेत्र रामा येथे श्रीरामकथा ज्ञानयज्ञ

By Admin | Published: March 26, 2015 12:11 AM2015-03-26T00:11:58+5:302015-03-26T00:11:58+5:30

भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र रामा येथे २८ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान श्रीराम व संकटमोचन हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रीराम कथा ज्ञानयज्ञ हरिनाम सप्ताह .....

Sriramakatha and Gyanjyanya at ShreeKhetra Rama | श्रीक्षेत्र रामा येथे श्रीरामकथा ज्ञानयज्ञ

श्रीक्षेत्र रामा येथे श्रीरामकथा ज्ञानयज्ञ

googlenewsNext

पूर्णानगर : भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र रामा येथे २८ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान श्रीराम व संकटमोचन हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रीराम कथा ज्ञानयज्ञ हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम कथेचे वाचन हभप कैलाश महाराज चांदूरकर यांच्या वाणीतून होणार आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व हभप आदित्य महाराज रोडे करतील. दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. रोज सकाळी ६ ते ७ काकडी आरती, सकाळी ७ ते ९ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण, सकाळी ९ ते १२ श्रीराम कथा, दुपारी १२ ते २.३० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ६ श्रीराम कथा, सायं. ६.३० ते ७.३० हरीपाठ, भारुड रात्री ८ ते ११ पर्यंत नामसंकीर्तन होईल.
यामध्ये हभप ज्ञानेश्वर महाराज गाडेकर, हृषीकेश महाराज, आकाश महाराज तिखिले, सचिन देव महाराज, पंकज महाराज पोहोकार, रघुनाथ महाराज होळकर, उषा होळकर (औरंगाबाद), यांचे कीर्तन, ३ एप्रिल रोजी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ अभिषेक पूजन, ग्रंथपूजा, पूजा होईल. एप्रिलला कैलाश महाराज चांदुरकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद होईल. ३ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता श्रीची पालखी निघेल. (वार्ताहर)

Web Title: Sriramakatha and Gyanjyanya at ShreeKhetra Rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.