एसआरपीएफ जवान कुठलीही स्थिती हाताळण्यास सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:07+5:302021-07-11T04:11:07+5:30
अमरावती : एसआरपीएफ जवान कुठल्याही परिस्थितीत कर्तव्य बजावण्यात सक्षम असतात. मग ती पृष्ठभूमी कायदा-सुव्यवस्था हाताळण्याची असो वा सामाजिक. ...
अमरावती : एसआरपीएफ जवान कुठल्याही परिस्थितीत कर्तव्य बजावण्यात सक्षम असतात. मग ती पृष्ठभूमी कायदा-सुव्यवस्था हाताळण्याची असो वा सामाजिक. ही सज्जता येथे रक्तदानातूनही प्रकट होत असल्याचे समाधान अधिकारी म्हणून लाभले आहे, असे प्रतिपादन सहायक समादेशक एन.एन. सोळंके यांनी केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम राज्यभरात होत आहे. त्याअंतर्गत अमरावती येथे एसआरपीएफ कॅम्पमध्ये रक्तदान शिबिर शनिवारी पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानाहून सहायक समादेशक एन.एन. सोळंके बोलत होते.
एसआरपीएफचे समादेशक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर समादेशक (सहायक) प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक एम.बी. नेवारे व आर.ए. राऊत, डॉ. रूची सारडा, डॉ. पावडे, लोकमतचे हॅलो हेड गणेश वासनिक, लोकमतचे विभागीय वितरण व्यवस्थापक रवींद्र खांडे उपस्थित होते. कॅम्प सभागृहात आयोजित शिबिरात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने रक्तसंकलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कडुकार व संचालन साहील नवाडे यांनी केले. सागर सपाटे, एस. बी. दहिकर, पीडीएमसीचे विद्यार्थी आनंद आठवले, प्राजक्ता चोपडे, वैष्णवी सावके, साक्षी उगले, पूजा मते यांचे सहकार्य लाभले.
यांनी केले रक्तदान
ए पॉझिटिव्ह : अमोल सावरकर, प्रवीण बहाडे, रमेश बेलसरे, वैभव अंबरते, योगेश उमाळे, मीलन राऊत, प्रतीक ठाकरे, गणेश ढोके,
बी पॉझिटिव्ह : चंद्रकांत ठाकरे, मनोज वानखडे, राहुलसिंह चांदवडे, संभाजी पालवे, कुणाल गवई, अजय चाफळे, जगन्नाथ नाईक, दिवाकर मरसकोल्हे, नीलेश पोकळे, अतुल चौधरी, अनिल राठोड, सचिन आंबेकर, दिनेश कडुकर, विनोद रणधीर, दिनेश बल्लाळ
ओ पॉझिटिव्ह : बाळकृष्ण खांडेकर, पंकज पाटील, अमित अंभोरे, कैलास राठोड, संजय बावणे, मनीष भुयारकर, बंटी चौहान, प्रवीणकुमार चौरपगार, मयूर गावले, हिंमत कऱ्हाडे, किशोर वानखडे, सूरज आंबडकर, सचिन सूर्यवंशी