एसटी बस धावताहेत रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:01:17+5:30

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. लहान-मोठे व्यापार ही अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबर एसटी महामंडळालाही जबर फटका बसला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून एसटी बसचे चाक एकाच जागेवर थांबले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा नुकसानाचा भार महामंडळाला बसला. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मिळकतीवर झाला आहे.

ST buses are running empty | एसटी बस धावताहेत रिकाम्या

एसटी बस धावताहेत रिकाम्या

googlenewsNext
ठळक मुद्देमहामंडळाला फटका, तोटा वाढतोय, अंतर्गत खर्च भागविणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्याच्या ग्रामीण भागात धावत असलेल्या एसटी बस प्रवासी नसल्याने रिकाम्या धावत आहेत. यामुळे प्रवाशांअभावी रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांना महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली आहे. परिणामी प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू असणाºया एसटी बसेस बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. या सर्व प्रक्रिया थांबल्याने अंतर्गत खर्च भाविणेदेखील कठीण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. लहान-मोठे व्यापार ही अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबर एसटी महामंडळालाही जबर फटका बसला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून एसटी बसचे चाक एकाच जागेवर थांबले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा नुकसानाचा भार महामंडळाला बसला. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मिळकतीवर झाला आहे. तोट्यातील एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी काही ठिकाणी बसगाड्या सुरू केल्या. परंतु, या एसटी बस प्रवाशांविनाच रस्त्यावरून धावत आहेत. यामुळे आधीच तोट्यात असणाºया महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाला पुन्हा मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतरही नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यामुळे बाहेरगावी, नातेवाइकांकडे वा इतरत्र जाणाºयांची संख्या रोडावली आहे. आवश्यकता भासल्यास दुचाकीने जाण्याचा पर्याय नागरिकांनी पसंत केला आहे. त्यामुळे एसटी बसला प्रवासी मिळत नाहीत. अशा स्थितीत रिकाम्या गाड्या रस्त्याने फिरवून तोटा वाढवण्यापेक्षा त्या पुढील कालावधीसाठी बंद होण्याचा मार्गावर असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांनी फिरवली पाठ
कोरोनाच्या भीतीने प्रवासी एसटी बसमध्ये बसण्यास तयार नसल्याने राज्यभरातील एसटी बसेस रिकाम्या धावत आहेत. अनेक प्रवासी खासगी वाहनांनी ये-जा करताना दिसत आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांनी एसटी बसचा प्रवास तूर्तास टाळला आहे.

Web Title: ST buses are running empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.