एसटी वाहकाची महिला प्रवाशांसोबत हुज्जत

By admin | Published: August 21, 2016 12:09 AM2016-08-21T00:09:28+5:302016-08-21T00:09:28+5:30

अमरावती-नागपूर मार्गे धावणाऱ्या एसटी बसमधील मुजोर वाहक कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे.

ST carrier passes with women passengers | एसटी वाहकाची महिला प्रवाशांसोबत हुज्जत

एसटी वाहकाची महिला प्रवाशांसोबत हुज्जत

Next

नागरिकांशी मुजोरी : पोलिसांकडून मध्यस्थी
गुरुकुंज (मोझरी) : अमरावती-नागपूर मार्गे धावणाऱ्या एसटी बसमधील मुजोर वाहक कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे. महिला, विद्यार्थी, वृद्धांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी रात्री तिवसा येथून बसलेल्या महिला प्रवाशांसोबत वाहकाने हुज्जत घालून अशोभनीय शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे गुरुकुंजातील बसस्थानकात या वाहकाला प्रवाशांनी काही काळ जाब विचारण्यासाठी थांबविले व पोलिसांना सदर बाब कडवून त्यांचा मार्फत या या मुजोर वाहकावर कारवाची ची मागणी केली
तिवसा येथून गुरुकुंज मोझरी करिता प्रवाशांसोबत ३ महिला प्रवासी चढल्या. नागपूर-वाशीम, एम.एच ४०/वाय ५५४७ क्रमांकाचा वाहक सी.एल.पवार यांनी सदर बसला मोझरी थांबा नाही. गाडीत चढले तर रात्रीच्या वेळी अमरावतीला घेऊन जाऊ, असा दम भरला. त्यामुळे महिला प्रवाशांनी सदर वाहकाला विनंती करून मोझरी येथे बस थांबा असल्याची आठवण करून दिली. त्यावर वाहकाने अशोभनीय भाषेत हुज्जत घातली. बस थांबून ठेवली तरी या महिला बसमधून उतरत नाही, असे दिसल्यावर तुम्हाला अमरावती घेऊन जाऊ, अशी धमकी भरली. त्यामुळे घाबरलेल्या या महिला प्रवाशांनी निकटवर्तीयांना माहिती दिली. तिवसा पोलिसांना दूरध्वनीवरून कळविले गेले. बस मोझरी डेपोत येताच थांबविली. बसचालक व वाहकाला थांबा नाही का!असा जाब विचारला असता चालकाने आपली जबाबदारी झटकत सदर वाहकानेच थांबा नाकारून प्रवाशांसोबत हुज्जत घातल्याचे सांगितले.
याचवेळी तिवसा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रवाशांना दरडावून मोझरी येथे सुपर बसला थांबा नाही. आम्हालाही अनेकदा या प्रसंगाला सामोरे जावे लागले, असे वक्तव्य केले. आमच्या जीवाची जवाबदारी कोण घेईल!तुम्ही घ्याल का, असा सवाल महिलांनी केला असता हात झटकले व बस वाहकाला कुठलीही आवश्यक माहिती न विचारता बस जाऊ दिली.

Web Title: ST carrier passes with women passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.