एसटीची ट्रकला पाठीमागून धडक, ३२ प्रवासी जखमी, जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल

By उज्वल भालेकर | Published: February 21, 2023 01:42 PM2023-02-21T13:42:34+5:302023-02-21T13:49:14+5:30

पिंपळविहीर येथे घडला अपघात; खासदार नवनीत राणा यांनी अपघातग्रस्तांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली

ST collides with truck, 32 passengers injured; Admitted to District General Hospital | एसटीची ट्रकला पाठीमागून धडक, ३२ प्रवासी जखमी, जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल

एसटीची ट्रकला पाठीमागून धडक, ३२ प्रवासी जखमी, जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल

googlenewsNext

अमरावती : शहरातील नांदगाव पेठ पोलीसस्टेशन हद्दीतील पिंपळविहिर ते सावर्डी येथे मंगळवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एसटीने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये एसटीतील प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुगणालय इर्विन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवळपास ३२ किरकोळ जखमी प्रवासी उपचारासाठी  झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.

प्राप्त माहितीनूसार नागपुर ते आकोट मार्ग जाणारी एम.एच.४० एक्यू ६४३३ क्रमांकाच्या एसटीने पिपंळीविहीर ते सावर्डी या मार्गावर समोर असलेल्या एम.एच.२० बी.टी ७२८८ क्रमांकाच्या ट्रकला मागून धडक दिली. यावेळी एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी हे प्रवासकरत होते. त्यामुळे यातील बहुतांश प्रवासी हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली होती. यावेळी नांदगावपेठ पोलीसांनीही घटनास्थळ गाठून सर्व जखमींना इर्विन रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त माहितीनूसार जवळपास ३२ प्रवासी हे उपचारासाठी दाखल झाले असून हे सर्व प्रवासी किरकोळ जखमी आहेत. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी इर्विन रुग्णालयात भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्याकडून माहिती घेत, जखमी रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

Web Title: ST collides with truck, 32 passengers injured; Admitted to District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.