जिल्ह्यात एसटी महामंडळाचे उत्पन्न घटल्यात जमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:36+5:302021-05-28T04:10:36+5:30

एसटीच्या वसुलीनंतरच मिळाले कर्मचाऱ्यांचे पगार अमरावती : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे उत्पन्न नसल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत ...

ST Corporation's income in the district is declining! | जिल्ह्यात एसटी महामंडळाचे उत्पन्न घटल्यात जमा !

जिल्ह्यात एसटी महामंडळाचे उत्पन्न घटल्यात जमा !

Next

एसटीच्या वसुलीनंतरच मिळाले कर्मचाऱ्यांचे पगार

अमरावती : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे उत्पन्न नसल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत वेतन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, एसटी महामंडळाच्या वसुलीनंतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे गत महिन्याचे वेतन करण्यात आले आहेत. परंतु, सद्यस्थितीत एसटी महामंडळ तोट्यात आले आहे.

कोरोना संसर्गाचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन करणे अवघड झाले आहे. गतवर्षीही चालक, वाहकांचे वेतन थकले होते. एसटी बसेस उभ्याच असल्याने महामंडळाला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने थकबाकीसाठी इतर विभागांना पत्र पाठविणे सुरू केले होते. अमरावती जिल्ह्यातील थकबाकी पूर्ण जमा झालेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मागील महिन्यात वेतन मिळू शकले.

बॉक्स

कर्मचाऱ्यांचे वेतन झाले

एसटी महामंडळाचे उत्पन्न अत्यंत कमी झाले असले तरी सर्व कर्मचाऱ्यांचे मागील महिन्यांचे वेतन पूर्ण करण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांना वेतनासाठी ताटकळत ठेवण्यात येत नाही. एसटी महामंडळाची थकबाकी सध्या राहिलेली नाही.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक

बॉक्स

कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीत

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अगोदरच वेतन कमी आहे. त्यातही ज्या महिन्यात वेतन लांबले त्यावेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे. त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यांचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत आहे. परंतु, याबाबत काही कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली.

बॉक्स

थकबाकीची वसुली

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी महामंडळाने इतर विभागांकडे असलेली थकबाकी वसुल करण्यास सुरुवात केली होती. एसटी महामंडळाच्या अमरावती विभागाची सर्व थकबाकी वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक विभाग व अन्य काही विभागांकडे असलेली थकबाकी वसूल झालेली आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील एकूण आगार- ८

एकूण कर्मचारी- २५०४

वाहक - ८६५

चालक -८००

महिन्याला वेतनावर होणारा खर्च ५ कोटी ७२ लाख १८ हजार

सध्याचे रोजचे उत्पन्न -५००००

कोट

एसटीचे उत्पन्न बंद असल्यामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळते की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.एसटी महामंडळाने आधीच तरतूद करून कर्मचाऱ्यांना वेतन नियमित व वेळेवर देणे आवश्यक आहे.

बाळासाहेब राणे

विभागीय कार्याध्यक्ष एसटी कामगार सेना अमरावती

Web Title: ST Corporation's income in the district is declining!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.