एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो ,ना वैद्यकीय बिले मिळतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:16+5:302021-09-15T04:17:16+5:30

परिवहन महामंडळांची कर्मचाऱ्यांची बिकट स्थिती; कधी गाडी येणार रूळावर अमरावती; राज्य परिवहन महामंडळातील वाहक,चालक,अधिकारी,कर्मचाऱ्यांना कोरोना चांगलाच फटका बसला आहे.कोरोनामुळे ...

ST employees do not get salary on time, nor do they get medical bills! | एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो ,ना वैद्यकीय बिले मिळतात !

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो ,ना वैद्यकीय बिले मिळतात !

Next

परिवहन महामंडळांची कर्मचाऱ्यांची बिकट स्थिती; कधी गाडी येणार रूळावर

अमरावती; राज्य परिवहन महामंडळातील वाहक,चालक,अधिकारी,कर्मचाऱ्यांना कोरोना चांगलाच फटका बसला आहे.कोरोनामुळे वाहतुक बंद करण्यात आल्याने आगारात बसेस उभ्या होत्या.त्यामुळे महामंडळाचे कोटयावधीचे नुकसान झाल्याने वाहक,चालक,अधिकारी ,कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर मिळेनात,याशिवाय वैद्यकीय बिलेही लवकर मंजूर होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

कोरोना जवळपास दिड ते दोन वर्ष अनेकांना भाेवला. त्यात जास्त फटका परिवहन महामंडळाला बसला.यात महामंडळ भरडल्याने चालक,वाहक वेतनअभावी अनंत अडचणी त्याच्यासमोर निर्माण झाल्या,भरभाडे देणे,किराणा सामानाचे पैसे चुकते करणे,वैदयकीय उपचाराचे देयके अशा अनेक समस्या निर्माण झाल्यात.पैसे येण्याची शक्यता नसल्याने अनेकांनी वाहक व चालकांना टाळणेच पसंत केले होते.

बाॅक्स

जिल्ह्यातील एकूण आगार-८

वाहक-८६०

चालक-७९०

अधिकारी-३५

एकूण कर्मचारी-२४५०

बॉक्स

वेतनासाठी महिनाभर प्रतिक्षा

कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन देणे एसटी महामंडळाला कठीण होत आहे.वेळोवेळी राज्य शासनाने मदत केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला.

दर महिन्याला वेळेवर कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही.कधी १५ दिवस तर कधी महिनाभर कर्मचाऱ्यांना वेतनासाठी प्रतिक्षा करावी लागते.

बॉक्स

वैद्यकीय देयके दिड वर्षापासून मिळेनात

दिड वर्षापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयके मिळालेली नाहीत.वैद्यकीय देयकांसोबत कोरोनाच्या उपचाराची देयकेही कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाने दिली नाहीत.प्रकृती बिघडल्यानंतर एसटी कर्मचारी डॉक्टरकडे उपचार घेतात.

त्याची देयके एसटी महामंडळाकडे सादर करतात परंतु दिड वर्षापासून देयकांसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्यामुळे उपचारासाठी इतरांकडून घेतलेल्या पैशाची परतफेड कशी करायची असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे.

बॉक्स

वैद्यकीय बिल वेळेवर द्यावे

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही.अगोदरच वेतन कमी अशातच कोरोना काळातील अनेक कर्मचाऱ्यांनी मागील वर्षभरापासून वैद्यकीय देयके सादर केले आहेत.मात्र अद्यापही वैद्यकीय बिले मिळालेे नाहीेत.त्यामुळे प्रकृती बिघडल्यास उसणवारीवर उपचार केलेल्या खर्चाची परतफेड कशी करायची या प्रश्न पडला आहे.

माेहीत देशमुख

विभागीय सचिव एसटी कामगार संघटना

कोट

कर्मचारी वेतन कमी अन तोही वेळेवर होत नाही. अशा स्थिती कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणे कठीण जाते.अशातच कोरोना काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी उपचाराचे देयके सादर केली.परंतु अजूनपर्यतही ही देयके मिळालेली नाहीत.कर्मचाऱ्यांची पेडींग असलेली देयके तातडीने द्यावीत

शक्ती चव्हाण विभागीय कामागार सेना अध्यक्ष

कोट

कर्मचाऱ्यांची देण्याचा प्रयत्न करू

कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न बंद झाले होते.त्यामुळे कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके देणे शक्य झाले नाहीत.आता एसटीची वाहतुक सुरळीत होत आहे. त्यानुसार वरिष्ठाच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके देण्याचा प्रयत्न केला जाईल.

श्रीकांत गभणे विभाग

नियंत्रक एसटी महामंडळ

Web Title: ST employees do not get salary on time, nor do they get medical bills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.