एसटीची रातरानी रिकामी, ट्रॅव्हल्स मात्र हाउसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:55+5:302021-07-15T04:10:55+5:30

लॉकडाऊनमुळे ४ वाजतानंतर एसटी बसेस उपलब्ध होत नाही. संपूर्ण मदार ट्रॅव्हल्सवर, स्वच्छतेने खेचली सर्वाधिक गर्दी अमरावती : जिल्हा ...

ST is empty overnight, but travels are full! | एसटीची रातरानी रिकामी, ट्रॅव्हल्स मात्र हाउसफुल्ल!

एसटीची रातरानी रिकामी, ट्रॅव्हल्स मात्र हाउसफुल्ल!

Next

लॉकडाऊनमुळे ४ वाजतानंतर एसटी बसेस उपलब्ध होत नाही. संपूर्ण मदार ट्रॅव्हल्सवर, स्वच्छतेने खेचली सर्वाधिक गर्दी

अमरावती : जिल्हा अनलाॅकची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या काही एसटी बसेस रात्रीच सुरू आहेत. यामुळे प्रवाशांना वेळेपूर्वी नियोजित स्थळी पोहोचता येणार आहे. एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्स स्वच्छ असल्याने या वाहनांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पहिली पसंती प्रवाशांकडून दिली जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडे स्लीपर कोच गाड्या कमी आहेत. त्याशिवाय त्याची स्वच्छता राहत नाही. त्यामुळे प्रवासी नापसंती दर्शवितात. एसटीपेक्षा अधिक तिकीट असतानाही ट्रॅव्हल्सने प्रवास सोयीस्कर वाटू लागले आहे. एसटी महामंडळानेही याची दखल घेतली तर एसटीलाही चांगले प्रवासी मिळतील, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. सध्या अमरावतीतून एकच बस रात्रीला सुरू आहेत. डेपोतीलही बसेस रात्रीला अमरावती येथून सोडल्या जात आहेत.

बॉक्स

एसटीच्या सुरू असलेल्या रातरानी

अमरावती ते पंढरपूर ही एकच रातराणी बस सुरू होती. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने आता ती बंद आहे.

बॉक्स

एसटीकडे एकही स्लीपर कोच नाही

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाकडे एकही स्लीपर कोच गाडी नाही. परिणामी

स्लीपर कोच करिता एसटीकडे येणाऱ्या प्रवाशी फिरकत नाही.

एसटीकडे शयनायनच्या २ बसेस आहेत.

बॉक्स

टॅव्हल्सपेक्षा एसटीचे तिकीट कमी

एसटी महामंडळाकडे अमरावती - पुणे साधारण गाडी, शिवशाही वातानुकूलित आसनी बससे धावतात या बसेसचे प्रवासी भाडे टॅव्हल्सपेक्षा कमी आहेत. कारण प्रवाशांची पसंती असलेल्या बसेस स्थानिक महामंडळाचे विभागाकडे नसल्याचा हा परिणाम आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांच्या पसंतीच्या गाड्या असल्याने तिकीटही अधिक असताना प्रवाशांचा कलही तिकडेच दिसून येत आहे.

बॉक्स

स्वच्छ अन्न आरामदायी प्रवास

कोट

एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्सचा प्रवास सुखकारक आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी व नीटनेटका असताे. तशी स्वच्छता एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पाहायला मिळत नाही. यामुळे पुण्याला जाताना एसटी ऐवजी ट्रॅव्हल्स लाच पसंती दिली जाते. यामुळे बहुतांश वेळा ट्रॅव्हल्सनी प्रवास केला.

- जयेश अजमीरे,

प्रवासी

कोट

ट्रॅव्हल्सच्या वेळा एसटीच्या तुलनेत मोजक्या आहेत. सोबतच स्लीपर कोच गाड्या कमी आहेत. त्यामुळे आरामदायी प्रवास रात्रीच्या वेळी अन् तोही लांबपल्ल्याचा करणे कठीण जाते. त्यामुळे दूरच्या प्रवाशांची पसंती ट्रॅव्हल्सकडे अधिक आहे. यातही प्रवासासाठी ॲडव्हान्स बुकिंग करण्यात येते. यामुळे आपल्याला हवी असलेली जागा आणि स्लीपर कोच गाडी उपलब्ध होते. कोरोनाकाळात सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. यामुळे ट्रॅव्हल्सला पसंती आहे.

- अभिषेक कावरे,

प्रवासी

Web Title: ST is empty overnight, but travels are full!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.