एसटी पासचा प्रवास महागणार
By admin | Published: June 29, 2014 11:41 PM2014-06-29T23:41:48+5:302014-06-29T23:41:48+5:30
मार्च आणि जून महिन्यात राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरातवाढ केली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून मासिक पासमध्ये वाढ होणार आहे. ही भाडेवाढ १२ टक्क्यांपर्यंत राहणार आहे.
अमरावती : मार्च आणि जून महिन्यात राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरातवाढ केली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून मासिक पासमध्ये वाढ होणार आहे. ही भाडेवाढ १२ टक्क्यांपर्यंत राहणार आहे. विद्यार्थ्यांना हा आर्थिक भार सोसावा लागणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी शिक्षणासाठी शहरात येतात. अशा विद्यार्थ्यानसाठी शैक्षणिक सुविधा म्हणून महामंडळाने मासिक पासची सुविधा केली आहे. सहा कि.मीपेक्षा जास्त अंतर असलेल्या प्रवासासाठी ‘ही सुविधा दिली जाते. मागील वर्षी जिल्ह्यातील ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी मासिक पासेस घेतल्या होत्या. यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढल्याने वाढ होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष संपत आल्यावर दोन वेळा तिकीट दरात वाढ झाल्याने विद्यार्थ्यी पासही महागणार आहे. पहिल्या दोन स्टेजमध्ये दरवाढ होणार नसली तरी पुढील स्टेजवर दरवाढ लागू होण्याची शक्यता राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना यापूर्वी कागदी पास दिली जात होती. या पासचा गैरवापर होत होता. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. तीन वर्षे मुदतीच्या स्मार्टकार्डमध्ये विद्यार्थ्यांनी जन्मतारीख, नाव, प्रवासाचा मार्ग व पासची मुदत आदी उल्लेख करावा.