एसटीने पुन्हा गाठले भाेपाळ, खंडवा, पांढुर्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:05+5:302021-09-23T04:14:05+5:30

पान २ परराज्यातील बसना समाधानकारक प्रतिसाद; बंद फेऱ्याही सुरू करण्याचे नियोजन अमरावती : महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशात जाणाऱ्या ...

ST reached again Bhaepal, Khandwa, Pandhurna | एसटीने पुन्हा गाठले भाेपाळ, खंडवा, पांढुर्णा

एसटीने पुन्हा गाठले भाेपाळ, खंडवा, पांढुर्णा

googlenewsNext

पान २

परराज्यातील बसना समाधानकारक प्रतिसाद; बंद फेऱ्याही सुरू करण्याचे नियोजन

अमरावती : महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच आहे. मात्र, गत अनेक महिन्यांपासून एसटीची सेवा येथे बंद करण्यात आली होती. परिणामी प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आता मात्र राज्य परिवहन महामंडळाने मध्य प्रदेशसाठी बस सेवा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा झाली असून एसटीच्या तिजोरीत वाढ होत आहे.

कोरोनाचे संकटामुळे सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेले एसटीची चाके थांबली होती. खासगी बससोबत स्पर्धा असणार एसटीची आर्थिक परिस्थिती आधीच फारशी चांगली नव्हती. त्यात कोरोनाचे विघ्न आले. प्रवासी वाहतूक बंद झाल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न बंद झाले. परिणामी एसटीने मालवाहतूक सुरू केली. बस बंद असल्याने वाहक-चालक व कर्मचाऱ्यांना वेतन देणेही महामंडळाला कठीण होऊन बसले होते. मे महिन्यात कोरोनाची लाट ओसरल्यानंतर प्रवाशांसाठी एसटीने बसफेऱ्या सुरू केल्या. अमरावती येथून मध्य प्रदेशातील भ़ोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर, मुलाताई, पांढुर्णा, छिंदवाडा, बैतूल, इंदौर आदी ठिकाणी बस धावू लागल्या आहेत. सध्या परराज्यात धावत असलेल्या बसफेऱ्यांना प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अपेक्षित असा प्रतिसाद नसल्याने फेऱ्याची संख्या कमी जात केली जात आहे.

बॉक्स

परराज्यात जाणाऱ्या बस

अमरावती-खंडवा

अमरावती-बऱ्हाणपूर

अमरावती-पांढुर्णा

अमरावतीे-मुलताई

अमरावती-भोपाळ

नागपूर-अमरावती-इंदौर

अमरावती-बैतुल

अमरावती-छिंदवाडा

बॉक्स

हैद्राबाद जाणाऱ्या फेऱ्या बंदच

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाकडून आंध्र प्रदेश राज्यात धावणारी अमरावती ते हैद्राबाद या एसटी बसच्या दिवसातून दोन फेऱ्या जात असत. परंतु, कोरोनाचा संसर्ग आल्यापासून आता आटोक्यात आल्यानंतरही अद्याप दोन्ही फेऱ्या बंदच आहेत. विशेष म्हणजे, हैद्राबाद येथून येणाऱ्या बस बंद असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

५० टक्के वाहक-चालकांचे लसीकरण पूर्ण

स्थानिक एसटी महामंडळाच्या अमरावती विभागात ७९१ चालक कार्यरत आहेत. यापैकी ४९६ जणांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. ८४० वाहकांपैकी ४८९ जणांचे लसीकरण झाले आहे. परराज्यात सध्या महामंडळाच्या जवळपास १४ फेऱ्या दररोज होत आहेत. या बसवरील चालक आणि वाहक ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशांना बसफेरीवर पाठविले जात आहे.

कोट

अमरावती विभागातून नुकत्याच परराज्यात जाणाऱ्या एसटी बस सुरू केल्या आहेत. यात प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद नसला तरी समाधानकारक प्रतिसाद असल्याने सध्या बऱ्हाणपूर व हैद्राबाद या दोन गाड्या बंद आहेत. लवकरच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून यासुद्धा फेऱ्या सुरू केल्या जातील.

- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक

Web Title: ST reached again Bhaepal, Khandwa, Pandhurna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.