एसटीची दरवाढ अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:58 PM2018-05-25T22:58:32+5:302018-05-25T22:58:32+5:30
पेट्रोल-डिझलेची सातत्याचे दरवाढ होत असल्यामुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासाचे तिकीट दरवाढ अटळ मानली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पेट्रोल-डिझलेची सातत्याचे दरवाढ होत असल्यामुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासाचे तिकीट दरवाढ अटळ मानली जात आहे. येत्या जूनपासून ८ ते १० टक्क्यांनी एसटीचे प्रवास भाडे महागतील, असे संकेत आहे. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांना झळ पोहचणार आहे.
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून दरदिवशी शेकडो बसफेऱ्या राज्यभरात सोडल्या जातात. विशेषत: नागपूर, यवतमाळ, परतवाडा या मार्गासाठी दरअर्ध्या तासांनी बसफेºया धावतात. जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरू होणार आहे. अशातच जून महिन्यात एसटीचे तिकीट महागल्यास याचा मोठा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
तिकीट दरवाढ झाल्यास कमीत कमी १०, तर जास्तीत जास्त ६० रुपयांपर्यंत आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. इंधन दरवाढीमुळे खासगी ट्रॅव्हर्ल्सचे प्रवास भाड्यातही वाढ होणार असून, २० ते ३० रुपयांपर्यत तिकीटचे दर वाढतील, अशी माहिती आहे. तिकीट दरवाढीचा फटका शिवशाही, शिवनेरी, लाल व एसटीने प्रवास करणाºयांना बसणार आहे. हल्ली अमरावती-नागपूर शिवशाही तिकीट दर २४५, जलद बस १६५, अमरावती- परतवाडा शिवशाही तिकीट दर ८६ रुपये व जलद बस ५८ रूपये तर अमरावती-यवतमाळ शिवशाही १४५, जलद बस १०५ रूपये प्रवास भाडे आहे.
जूनपासून वाढीव तिकीट दर लागू झाल्यास आपसुकच प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील, असे संकेत आहे.
अद्यापपर्यंत एसटी तिकीट दरवाढीबाबत वरिष्ठांकडून पत्रव्यवहार नाही. हल्ली तिकीट दरवाढीची जोरदार चर्चा असली तरी अधिकृतपणे निर्णय लागू झाल्याशिवाय तिकीट दरवाढ होणार नाही.
- श्रीकांत गभने
विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ