वेतन रखडल्याने एसटी कर्मचारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:01:37+5:30

कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून एसटीची चाके थांबली. त्यामुळे चालक-वाहकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून ते घरीच आहेत. कोरोनाशी लढा देताना राज्य शासनाची आर्थिक घडी बिघडल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जात आहे. कपात केलेले वेतन वेळेवर मिळेल की नाही, अशी शंका अनेकांना होती. नेमके तेच समोर आले.

ST staff in crisis due to salary hike | वेतन रखडल्याने एसटी कर्मचारी संकटात

वेतन रखडल्याने एसटी कर्मचारी संकटात

Next
ठळक मुद्देअधिकारी तुपाशी, कर्मचारी उपाशी : १० एप्रिल उजाडले तरीही वेतन नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्यातील वेतन ७ तारखेला झालेले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. एसटी महामंडळातील वर्ग ३ व ४ श्रेणीतील कर्मचाºयांचे वेतन दर महिन्याच्या सात तारखेला केले जातात. परंतु एप्रिल महिन्याची १० तारीख उलटून गेली असतानादेखील मार्च महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाºयांची घालमेल सुरू झाली आहे. विशेष म्हणजे वर्ग एक व दोन श्रेणीतील अधिकाऱ्यांचे वेतन ४ एप्रिल रोजी झाले आहे.
कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून एसटीची चाके थांबली. त्यामुळे चालक-वाहकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून ते घरीच आहेत. कोरोनाशी लढा देताना राज्य शासनाची आर्थिक घडी बिघडल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जात आहे. कपात केलेले वेतन वेळेवर मिळेल की नाही, अशी शंका अनेकांना होती. नेमके तेच समोर आले.
क्लास-१ व क्लास-२ अधिकाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. ही कपात करून त्यांना ४ एप्रिल रोजी वेतन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के व वर्ग ४ च्या कर्मचाºयांना १०० टक्के वेतन देण्यात येणार आहे. एसटी महामंडळात या वर्गाचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला न चुकता केले जात होते. मात्र, यावेळी ही वेळ टळल्याने कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वेतन खात्यात जमा झालेले नव्हते. शुक्रवारी (गुड फ्रायडे) शनिवार (दुसरा) आणि रविवार, असे तीन दिवस सलग सुट्या असल्याने आता एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन सोमवारी होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडे पैशांची चणचण असल्यामुळे सोमवारीही वेतन होईल की नाही, अशी चिंता अनेकांना सतावत आहे.

Web Title: ST staff in crisis due to salary hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.