एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:51+5:302021-03-31T04:12:51+5:30

चांदूर बाजार : गतवर्षी कोरोनाकाळात आणि राज्याची परिस्थिती अगदी बिघडली असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारी प्रामाणिकपणे बजावली. एवढेच नव्हे तर ...

ST staff waiting for corona vaccination | एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा

एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा

Next

चांदूर बाजार : गतवर्षी कोरोनाकाळात आणि राज्याची परिस्थिती अगदी बिघडली असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारी प्रामाणिकपणे बजावली. एवढेच नव्हे तर टाळेबंदीच्या काळातही परराज्यातील कामगार, मजूर नागरिकांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचवण्याचे कर्तव्य एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बजावले. मात्र, आजही जोखमीच्या काळात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना लसीकरणाची प्रतीक्षा कायम आहे.

कोरोनाकाळात आणि त्यानंतर राज्यात १०९ एसटीचे कर्मचारी दगावले. साडेचार हजारांच्या घरात एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. असे असूनही शासनाच्या फ्रंट वॉरियरच्या यादीत एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाने प्राधान्याने आरोग्य, पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले. त्यानंतर महसूल, व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. परंतु, दररोज लाखो लोकांच्या संपर्कात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत आजही परिवहन विभाग व शासनाने कोणताही विचार केलेला नाही. राज्यात आतापर्यंत १०९ कर्मचारी, अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. टाळेबंदीच्या काळात आणि लॉकडाऊन प्रक्रियेनंतर एसटी विभागाचे कर्मचारी मजुरांची तसेच परराज्यातील नागरिकांची वाहतूक करीत होते. एसटीचे कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावून जीव मुठीत घेऊन प्रवाशांची वाहतूक करण्याचे काम आजही करीत आहेत.

राज्य सरकारने घोषित केल्यानंतर या यादीत प्रत्यक्षात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर पोलीस विभाग व महसूल विभागाचा समावेश करण्यात आला. मात्र, या यादीत प्रवासी वाहतूक करण्याचा एसटीच्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात आलेला नाही. आतापर्यंत एसटी विभागात जवळपास साडेचार हजार कर्मचाऱ्यांचा कोरोना प्रादुर्भाव झाल्याची माहिती एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तरीही एसटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून कर्मचारी प्रवासी वाहतूक करून त्यांचे कर्तव्य बजावत आहे.

यासंदर्भात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीच्या-चालक वाहकांना विचारणा केली असता, परिवहन विभागाने आमच्या लसीकरणाच्या बाबतीत अद्याप निर्णय घेतलेला नाही, कोरोनाच्या सावटात जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडावे लागत असल्याचे एका चालकाने सांगितले.

Web Title: ST staff waiting for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.