आजपासून एसटी धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:01:26+5:30
पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आव्हान महामंडळासमारे उभे ठाकले होते. तथापि, प्रवाशांकडून जिल्ह्याबाहेर वाहतूृक सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाकाळात पाच महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस गुरुवारपासून जिल्ह्याबाहेर पडणार आहेत. पहिल्या टप्यात नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये एसटी बसची प्रवासी वाहतूक सुरू केली जाणार आहे.
पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आव्हान महामंडळासमारे उभे ठाकले होते. तथापि, प्रवाशांकडून जिल्ह्याबाहेर वाहतूृक सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती. त्यामुळे शासनाने जिल्ह्याबाहेर बस सुरू करण्यास २० आॅगस्ट रोजी हिरवी झेंडी दिली. त्यानुसार उद्यापासून एसटी बस जिल्ह्याबाहेर धावणार आहेत.
लॉकडाऊन कालावधीत एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानाचा फटका सहन करावा लागला. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हांतर्गत एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. बसच्या क्षमतेपेक्षा अर्धे प्रवासी घेवून वाहतूक करावी लागत आहे. अशातच प्रवाशांचा प्रतिसादही खूपच कमी आहे. एक ते दोन तासांच्या फरकाने जिल्ह्यातील आठ एसटी आगारांमधून बस सोडण्यात येत आहेत. सोबतच बस स्थानकाहून सुटलेल्या बस मार्गस्थ कुठेही थांबत नसल्याने कमी प्रवासी घेऊन धावत असलेल्या एसटींकडून महामंडळासाठी खर्च जास्त अन् उत्पन्न कमी मिळत आहे. अशातच आता प्रवाशांच्या मागणीची दखल घेत शासनाने आता जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात येथील मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य आगारामधून जिल्ह्याबाहेर लालपरी धावणार आहे. गुरुवारपासून सुरू होत असलेल्या या सेवेचे यश आर्थिक आखाड्यांवर अवलंबून आहे.
अशा असतील आगारातून बसफेऱ्या
अमरावती ते यवतमाळ - सकाळी ८, १०, १२ वाजता, दुपारी २ व ४ वाजता
यवतमाळ ते अमरावती - सकाळी ११ आणि दुपारी १, २, ४ व ५ वाजता
अमरावती ते अकोला - सकाळी ८, १० व १२ वाजता, दुपारी २ व ४ वाजता
अकोला ते अमरावती - सकाळी ११ वाजता, दु. १, २, ३, ५ व सायं. ७ वाजता
अमरावती ते वाशिम- सकाळी ८, १० व १२ दुपारी २ व ४ वाजता
वाशिम ते अमरावती - सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजता.
परतवाडा ते अकोला - सकाळी ८, १० व १२ दुपारी २ व ४ वाजता.
अकोला ते परतवाडा- सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजता
वरूड ते नागपूर - सकाळी ८ , १० व १२, दुपारी २ व ४ वाजता.
नागपूर ते वरूड- सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजता
अमरावती ते वर्धा - सकाळी ८, १० व दुपारी २ व ४ वाजता.
वर्धा ते अमरावती - सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजता.
दर्यापूर ते मूर्तिजापूर - सकाळी ८, १० व १२, दुपारी २ , ४ व ५ वाजता.
दर्यापूर ते अकोट - सकाळी १० व १२, दुपारी २, ४ व ५ वाजता.