वाडेगावच्या स्मशानभूमीसाठी कर्मचारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:10+5:302021-09-14T04:16:10+5:30
फोटो - वाडेगाव १३ पी राजुरा बाजार : ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीबाबत कायम नकारात्मक बोलले जाते. प्रत्यक्ष काही सुविधा नसल्याने ...
फोटो - वाडेगाव १३ पी
राजुरा बाजार : ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीबाबत कायम नकारात्मक बोलले जाते. प्रत्यक्ष काही सुविधा नसल्याने ही स्थिती ओढवली आहे. तथापि, वाडेगावच्या स्मशानभूमीत सुविधाच पुरविण्यात आल्या नाही, तर देखभालीसाठी कर्मचारीही नियुक्त करण्यात आला आहे.
वाडेगाव येथील सरपंच सुधाकर दोड यांच्या पुढाकाराने चार एकरातील स्मशानभूमीत विविध हिरवीगार झाडे उभी झाली आहेत. बसण्यासाठी जागोजागी सिमेंट ओटे व २४ तास पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. रात्रीचा अंधार घालविण्यासाठी पथदिवे व मार्गातील पेव्हर नजरेत भरतात. स्मशानभूमी सभोवताल कुंपण,अंत्यविधीसाठी आलेल्या आप्तेष्टांना बसण्यासाठी बाके हे जिल्हा परिषद सदस्य राजीव बहुरूपी यांच्या निधीतून प्राप्त झाले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पथदिवे, स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र कामगाराची नियुक्ती अशआ सुविधा शासनाच्या विविध योजनांतून पूर्ण करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने ठरविले, तर त्या गावाचा विकास अशक्य नाही. इच्छाशक्ती मात्र हवी, असे सरपंच सुधाकर दोड याप्रसंगी म्हणाले.
---------------