तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:13 AM2021-04-04T04:13:30+5:302021-04-04T04:13:30+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ उपकेंद्रे असून, ४ उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवक/सेविकासहित ५ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यसेवक पदाच्या सहा ...

Staff at Talegaon Primary Health Center | तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा

Next

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ उपकेंद्रे असून, ४ उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवक/सेविकासहित ५ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यसेवक पदाच्या सहा जागा मंजूर आहेत. यात २ पदे रिक्त आहे.

कनिष्ठ सहायक पद मंजूर असून, विनापरवानगी गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती आहे. औषधी निर्माण अधिकारी हे पद मंजूर असून पद रिक्त आहे. त्याठिकाणी प्रतिनियुक्तीवर कर्मचारी कार्यरत आहे. परिचरासाठी एकूण ४ पदे मंजूर असून, १ पद रिक्त आहे.

आरोग्य साहायकाचे १ पद, तर आरोग्य सेविकेचे १ पद रिक्त आहे. याठिकाणी एकूण कायम मंजूर पदे २० असून रिक्त पदे १२ आहे. कंत्राटी मंजूर पदे ६ आहे. २६ पदांपैकी १४ पदे रिक्त असून महत्त्वाचे असलेले आरोग्यसेविकेचे ५ पद भरणे आवश्यक असल्याची माहिती आहे.

Web Title: Staff at Talegaon Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.