धनगर विकास मंचचा सीईओंच्या दालनात ठिय्या
By admin | Published: June 3, 2017 12:04 AM2017-06-03T00:04:45+5:302017-06-03T00:04:45+5:30
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी जिल्हा परिषदेच्यावतीने साजरी करण्यात आलेल्या जयंती दिनाला अनेक अधिकारी गैरहजर होते.
होळकर जयंती : दोषींवर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी जिल्हा परिषदेच्यावतीने साजरी करण्यात आलेल्या जयंती दिनाला अनेक अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे सूचना दिल्यावरही कार्यक्रमाला गैरहजर असलेल्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी शुक्रवारी विदर्भ धनगर विकास मंचच्यावतीने सीईओ (मुख्यकार्यकारी अधिकारी) किरण कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व पुण्यतिथी देशभर शासकीय कार्यालयात साजरी केली जाते. यावेळी आयोजित कार्यक्रमाला लोकसभा व राज्याच्या मंत्रालयातील सर्व मंत्री व अधिकारी हजर राहतात. मात्र जिल्हा परिषदेत यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला अनेक अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे बोटावर मोजण्या इतक्याच अधिकाऱ्यांची हजेरी होती. त्यामुळे सूचना दिल्यावरही हजर न राहीलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचने सीईओंकडे केली. दरम्यान सीईओ कुलकर्णी याबाबत माहिती घेऊन जे अधिकारी हजर नव्हते, त्यांना नोटीस देऊन खुलासा मागविला जाईल. त्याचे उत्तर समाधानकारक नाही अशांवर कारवाईचे आश्वासन झेडपीचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाला दिले. यावेळी जानराव कोकरे, मदन साखरे, सोमा कोरडकर आदी उपस्थित होते.