आटलेले जलस्रोत आणि पेटणारे वणवे वण्यप्राण्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:45+5:302021-05-01T04:11:45+5:30

फोटो पी ३० पोहरा पोहरा बंदी : उन्हाळ्यात वनव्याची तीव्रता आणि कोरडे जलस्त्रोत हे वन्यप्राण्यांना सोसावणारे नसल्याने वन्यप्राणी जंगलाबाहेर ...

Stagnant water sources and burning fires on wildlife | आटलेले जलस्रोत आणि पेटणारे वणवे वण्यप्राण्यांच्या जीवावर

आटलेले जलस्रोत आणि पेटणारे वणवे वण्यप्राण्यांच्या जीवावर

googlenewsNext

फोटो पी ३० पोहरा

पोहरा बंदी : उन्हाळ्यात वनव्याची तीव्रता आणि कोरडे जलस्त्रोत हे वन्यप्राण्यांना सोसावणारे नसल्याने वन्यप्राणी जंगलाबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. सूर्य आग ओकू लागल्याने जंगलातील पाण्याची डबकी कोरडी पडली आहेत. पोहरा, चिरोडी, वडाळी माळेगाव, चांदूर रेल्वे या वर्तुळातील जंगलालगत गाव परिसरात पहाटे व रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी नागरिकांच्या दृष्टीस पडतात. तीन ते चार दिवसांपूर्वी पोहरा गावातील जंगलालगतच्या वळू माता प्रक्षेत्र येथे बिबट फिरत असल्याचे रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना दिसून आल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी आरडा-ओरड करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. बिबट शिरल्याची एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी वनविभागातर्फे सिमेंट पाणवठे, कृत्रिम पाणवठे व वनतळे यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यंदा वन्यप्राण्यांना सिमेंट पाणवठ्याचा थोडा आधार आहे. पण तरीही तो पुरेसा नाही. कारण जंगलातील कृत्रिम पाणवठे व वनतळे पूर्णपणे आटले. वन्यप्राण्यांच्या ठिकाणानुसार पाणवठे असायला हवेत. मात्र तशी व्यवस्था नसल्याने वन्यप्राणी जंगलाबाहेर पडत आहेत.

बॉक्स

वरुडा बीटमधील वनतळे कोरडे

वन्यप्राण्यांच्या घशाला कोरड मोठ्या प्रमाणात वन्यप्रण्यांचा राबता असलेल्या वरुडा बीटमध्ये वनविभागाने एका वनतळ्याची निर्मिती करून त्यावर पाणीपुरवठ्याची कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आली होती. मात्र हे वनतळ पाण्याविना कोरडेच पडले आहे. या वनतळ्यातील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यामुळे त्यात पाणी जाऊ शकत नाही. त्यासाठी ती पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या उपाययोजनेत संबंधित वरुडा बीट वनरक्षक पुढे आले नसून ते केवळ बुजगावणे ठरले आहे. या वनतळ्यात दरवर्षी मुबलक पाणीसाठा राहत होता. यंदा पूर्णपणे कोरडेच असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

Web Title: Stagnant water sources and burning fires on wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.