शहर बसच्या फेरीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:33+5:302021-06-23T04:10:33+5:30
बडनेरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेल्या शहर बस मंगळवारपासून शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. सध्या अमरावती ...
बडनेरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेल्या शहर बस मंगळवारपासून शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. सध्या अमरावती बस स्थानक ते बडनेरा रेल्वे स्थानक मार्गावर तीन बस सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवासी तसेच कामकाजानिमित्त नियमित ये-जा करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अमरावती जिल्ह्यात उच्चांक गाठला होता. मार्च महिन्यात रेल्वे गाड्यांची संख्यादेखील कमी करण्यात आली होती. परिणामी प्रवाशांची संख्या घटली होती. संचारबंदीमुळे शहर बसला प्रवासी मिळत नव्हते. बस रिकाम्याच धावत असल्याने त्यांच्या फेऱ्या थांबविण्यात आल्या होत्या. आता काही दिवसांपासून कोरोना संसर्ग अगदी कमी झाल्याने अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात आली. जवळपास सर्वच व्यवहार, कामकाज सुरू झाले. बडनेरा शहरातून अमरावतीत जाणाऱ्यांची मोठी संख्या व ऑटोरिक्षांचे न परवडणारे भाडे लक्षात घेऊन शहर बस सुरू करण्याची मागणी पुढे आली होती. महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत बडनेरा रेल्वे स्थानकापासून ते अमरावती डेपो, नवसारी, विद्यापीठ अशा तीन मार्गांवर बसेस सुरू केल्या. प्रवासी संख्या वाढल्यास इतर मार्गांवर बस वाढविण्यात येतील. तिकीट दर पूर्वीप्रमाणेच असल्याचे सांगण्यात आले.