प्राथमिक शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:16 AM2021-09-07T04:16:23+5:302021-09-07T04:16:23+5:30

धारणी : राज्यात मागील मार्च २०२० पासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

Start elementary school | प्राथमिक शाळा सुरू करा

प्राथमिक शाळा सुरू करा

Next

धारणी : राज्यात मागील मार्च २०२० पासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोरोना महामारीच्या नियमांना अनुसरून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू कराव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या धारणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अतुल पटोले यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता ऑॅनलाईन शिक्षण यशस्वी होणे शक्य नाही. नेटवर्क समस्यामुळे ग्रामीण व गरीब पालकांना परवडणारे नसल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण हा पाया असून तोच ठिसूळ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीच्या नियम व अटीनुसार इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग ग्रामीण भागात सुरू आहेत. मात्र, यामुळे ग्रामीण क्षेत्रात कोरोना वाढलेला नाही. त्यामुळे पहिली ते सातवीचे टप्प्याने वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याचासुद्धा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अमरावती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रभुदास बिसंदरे, जिल्हा कार्यवाह रवींद्र घवळे, शिक्षक बँकेचे संचालक तथा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चौकसे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज कांदे, परिषदेचे धारणी तालुका अध्यक्ष संजय गंगराडे, तालुका कार्यवाह प्रशांत रोहणकर, तालुका कार्याध्यक्ष विजय जावरकर, तालुका उपाध्यक्ष गोविंद फुलमाली, तालुका उपाध्यक्ष उमेश पटोरकर, कार्यकारिणी सदस्य उमेश आकोडे, तालुका कोषाध्यक्ष राजेश खाडे, संघटक रवींद्र मालवीय उपस्थित होते.

Web Title: Start elementary school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.