तिवसा येथे शासकीय तूर खरेदीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:56 PM2018-02-03T21:56:10+5:302018-02-03T21:56:33+5:30
आॅनलाईन लोकमत
तिवसा : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तूर विक्रीचा पहिला मान सार्शी येथील पंकज वानखडे या शेतकऱ्याला मिळाला.
केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे नाही. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केली नाही. शेतकऱ्यांची बिकट अवस्था पाहून सरकारने दिलासा द्यायला हवा होता. या बजेटमध्ये सरकारने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश साबळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी रमेश पाटील, जि.प.सदस्य अभिजित बोके, पंचायत समिती उपसभापती लुकेश केने, तिवसा नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे, सरपंच रंजना पोजगे, बाजार समितीच्या सचिव ज्योती रोंघे, बाजार समिती उपसभापती कमलाकर वाघ, दिलीप काळबांडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष मुकुंद देशमुख, श्याम देशमुख आदी उपस्थित होते.
अचलपुरात बच्चू कडूंच्या हस्ते शुभारंभ
परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते नाफेडद्वारा तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश पवित्रकार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी रमेश पाटील, बाजार समितीचे संचालक गजानन मोरे, सचिव पोपट घोडेराव, पवन सार्वे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शासकीय तूर खरेदीचा लाभ शेतकऱ्यानी घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले, तर खासगी बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने तूर विकू नये असे आवाहन प्रकाश पवित्रकार यांनी केले.
अंजनगावात रमेश बुंदिलेंनी केले काटापूजन
अंजनगाव : बाजार समितीमध्ये आमदार रमेश बुंदिले यांच्या हस्ते काटापूजन करून नाफेडच्या तूर खरेदीचा शुभारंभ केला. मुऱ्हादेवी येथील गणेश अटाळकर या शेतकऱ्याला तूर विक्रीचा पहिला मान मिळाला. बाजार समितीचे सभापती संजय रोहणकर, बाळासाहेब पोटे, विजय काळमेघ, शेषराव बुंदिले, सचितानंद काळमेळ, सुधीर अढाऊ, संजय हाडोळे, सचिव गजानन नवघरे, अनिल मोहोड, खविसंचे अध्यक्ष अविनाश सदार, सदानंद वºहेकर, विकास भांबुरकर, अमोल घुरडे, व्यवस्थापक मधुकर बोंदे्र, मनोहर मुरकुटे, ओमप्रकाश काळमेघ, श्रीकृष्ण बुंदिले आदी उपस्थित होते.