बारावीच्या परीक्षेला प्रारंभ

By admin | Published: March 1, 2017 12:03 AM2017-03-01T00:03:58+5:302017-03-01T00:03:58+5:30

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून प्रारंभ झाली आहे.

Start of HSC exam | बारावीच्या परीक्षेला प्रारंभ

बारावीच्या परीक्षेला प्रारंभ

Next

विशेष भरारी पथक : जिल्ह्यात १२५ केंद्रावर ४२ हजार ५३ विद्यार्थी
अमरावती : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून प्रारंभ झाली आहे. ही परीक्षा २५ मार्चपर्यत चालणार आहे. जिल्ह्यात १२५ केंद्रावर ४२ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवारी सुरु झाली. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अधिक संधी उपलब्ध झाल्याने ही वाढ झाल्याचा अंदाज राज्य शिक्षण मंडळाचा आहे. अमरावती व बडनेरा असे दोन शहर मिळून २९ केंद्रावर परीक्षा सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्गाविरोधात लढा’ हे अभियान राबविले जात आहे. यापूर्वी ज्या केंद्रावर परीक्षेदरम्यान गैरप्रकार झालेत, त्या केंद्रांना भरारी पथकाने लक्ष केले आहे. इंग्रजी विषयाचे पेपर देताना विद्यार्थ्यांना व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या केंद्रावर गैरप्रकार झाल्यास ते शोधून काढता येणार आहे. माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. मंगळवारी परीक्षेच्या पहिल्या दिवशी हॉलमध्ये विद्यार्थ्यांा सोडण्यात आले. त्यानंतर परीक्षार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली. तर १० मिनिटांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका देण्यात आली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये काहीसे तणाव, भितीचे वातावरण पाहावयास मिळाले. पहिला पेपर असल्याने बहुतांश पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. गैरप्रकार रोखणे, कॉपीमुक्त अभियानासाठी पोलिसांच्या बंदोबस्त सुद्धा प्रत्येक केंद्रावर तैनात होता.

जिल्ह्यात गैरप्रकाराची तीन प्रकरणे
मंगळवारपासून सुरु झालेल्या बारावीची परीक्षेत पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तीन गैरप्रकाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. सदर विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई होणार आहे. शिक्षण मंडळाने नेमलेल्या भरारी पथकांकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी दिली. बुलडाण्यात ३, यवतमाळ ५, अकोला १ तर वाशिम येथे ५ गैरप्रकाराची प्रकरणे झाली आहे.

Web Title: Start of HSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.