मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:37+5:302021-06-25T04:11:37+5:30

जिप्सीचालक, मालक, गाईड संघटनेची मागणी, कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ अमरावती : कोरोना संसर्गामुळे पर्यटनस्थळ बंद आहे. याचा फटका मेळघाट व्याघ्र ...

Start a jungle safari at the Melghat Tiger Reserve | मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करा

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करा

Next

जिप्सीचालक, मालक, गाईड संघटनेची मागणी, कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ

अमरावती : कोरोना संसर्गामुळे पर्यटनस्थळ बंद आहे. याचा फटका मेळघाट व्याघ्र प्रकल्पालाही बसला आहे. गत दीड वर्षापासून निसर्ग प्रेमी, पर्यटक मेळघाटात आलेच नाही. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करावी, अशी मागणी गुरुवारी मेळघाट जिप्सीचालक, मालक, गाईड संघटनेने केली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा क्षेत्रसंचालक जयाेती बॅनर्जी यांना दिलेल्या निवेदनातून जिप्सी चालक, मालक, गाईड यांनी व्यथा मांडल्या. अनलॉक झाले असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्प आताही ‘लॉक’ आहे. पर्यटक परत जात आहेत. मेळघाटच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून, जिप्सीचालक, मालक, गाईड यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मेळघाटात या व्यवसायावर १०० जणांचे उदनिर्वाह चालते. त्यामुळे रोजगारासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करावी, अशी मागणी जावेद खान, ईब्बू शाह, जाकीर सिद्दीकी, शुभम देवरकर यांच्यासह अनेकांनी केली आहे.

Web Title: Start a jungle safari at the Melghat Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.