महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा थाटात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:08 PM2018-01-19T23:08:46+5:302018-01-19T23:09:16+5:30
नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महानगरपालिकाच्यावतीने आयोजित अखिल भारतीय महापौर चषक पुरुष व महिला गटातील कबड्डी स्पर्धेचे थाटत उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती: नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महानगरपालिकाच्यावतीने आयोजित अखिल भारतीय महापौर चषक पुरुष व महिला गटातील कबड्डी स्पर्धेचे थाटत उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील देशमुख होते.
नेताजी सामाजिक विकास संस्थेच्या रुक्मिणीनगरातील प्रांगणावर १९ ते २१ जानेवारी दरम्यान प्रथमच देशपातळीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांगणावर शेकडो क्रीडाप्रेमींना बसण्यासाठी भव्यदिव्य गॅलरी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ. अनिल बोंडे, मनपा आयुक्त हेमंत पवार, अरविंद को-आॅपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रकाश मक्रमपुरे, रामेश्वर अभ्यंकर, किरण पातूरकर, हरिभाऊ मोहोड, नगरसेवक विजय वानखडे, गोपाल धर्माळे, माजी कुलगुरू गणेश पाटील, सुनील पडोळे, प्रमिला जाधव, जितू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष नितीन देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, सचिव सतीश काळे, प्रफुल्ल देशमुख, शैलेश राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती. बापूरावजी वानखडे (आमलेकर) स्मृती पहिले पारितोषिक ७१ हजार ठेवण्यात आले आहे. जिजाऊ बँकेच्यावतीने महिला गटात पहिले पारितोषीक ४१ हजार रुपये आहे. याशिवाय अनेक परितोषिके खेळाडूंना देण्यात येणार आहेत.
यांच्यामध्ये रंगला पहिला सामना
पुरूष गटातील पहिला सामना हा नवशक्ती मंडळ (हैद्राबाद) व जागृती क्रीडा मंडळ (अमरावती) यांच्यात रंगला. महिला गटातील पहिला सामना श्री शिवाजी संघ (खामगाव) व करनाळा स्पोर्ट (रायगड) यांच्यात झाला. वृत्त लिहिस्तोवर दोन्ही सामन्यांचा निकाल हाती आला नव्हता. क्रीडाप्रेमींनी सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी के ली होती. महिला गटातील १०, तर पुरुष गटातील १८ संघ सहभागी झाले आहेत.