नागपूर-नरखेड-अमरावती पॅसेजर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:28 PM2018-12-26T22:28:04+5:302018-12-26T22:28:19+5:30
तालुका मुख्यालय आणि राज्य सीमेवरील मोठी बाजारपेठ असल्याने येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच नागपूर-नरखेड-अमरावती पॅसेंजर आणि कोल्हापूर-नागपूर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी आॅरेजसिटी प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुका मुख्यालय आणि राज्य सीमेवरील मोठी बाजारपेठ असल्याने येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच नागपूर-नरखेड-अमरावती पॅसेंजर आणि कोल्हापूर-नागपूर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी आॅरेजसिटी प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
सर्वेक्षणानंतर तब्बल ११२ वर्षांनी रेल्वे धावली तरी इंदूर-यशवंतपूरम, जयपूर-सिकंदराबाद, काचीगुडा या रेल्वे गाड्यांना वरूड येथे थांबा नाही. केवळ काचीगुडा एक्स्प्रेसला थांबा दिला. वरूड ही राज्य सीमेवरील मोठी बाजारपेठ तसेच संत्रा , मिरची उत्पादक प्रदेश आहे. शिर्डी, पंढरपूरसह महाराष्ट्र दर्शनाचा लाभ घेता यावा, याकरिता नागपूर-कोल्हापूर , गोंदिया-मुंबई तसेच नागपूर-नरखेड-अमरावती शटल सुरू करण्यात याव्या, वाढती गर्दी पाहता आॅरेंजसिटी स्थानकावर सर्वच रेल्वे गाड्या थांबविण्यात याव्या तसेच प्रवाशांकरिता प्लॅटफार्मवर शेडचे त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी प्रवासी संघाचे अध्यक्ष दत्ता शिंदे, नितीन खेरडे, संजय खासबागे, ज्ञानेश्वर बहुरूपी, योगेश ठाकरे, अशोक देवतेसह आदींनी केली आहे. मध्य रेल्वे बोर्ड समितीचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांची भेट घेऊन मागणी मांडणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय रेल्वे स्थानकावर दोनच कर्मचारी असल्याने आणखी कर्मचारी देण्याची मागणी केली आहे.