विद्यार्थ्यांविना शाळांना प्रारंभ; शिक्षक हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:43+5:30
दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधी अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
भातकुली : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची लगबग असते. पण, यंदा वा आतापर्यंत पहिल्यांदाच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी सोडून शिक्षक व पालकांची हजेरी लागलेली दिसत होती. कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळेचा पहिला दिवस पालक संघांच्या सभांनी पार पडला.
दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधी अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात शाळा कधी सुरू होणार, याची अनिश्चितता होती. मात्र, शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार २६ जून रोजी शाळा सुरु झाल्या. परंतू शाळेत विद्यार्थी नव्हते. २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळेत शिक्षकांची उपस्थिती मात्र दिसून आली. शुक्रवारी शिक्षण शाळेत दाखल झाल्याचे चित्र सर्वत्र होते. पण, विद्यार्थी नाही, असा विचित्र अनुभव पहिल्यांदाच शिक्षकांना आला. कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. त्याचा थेट प्रभाव जनजीवनावर झाला आहे. शुक्रवारी सर्वप्रथम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकाच्या उपस्थितीत सुरू झाल्या.
राज्य शासनाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार, शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. शाळेत मुलांना बोलवायचे की नाही, याचा अंतिम निर्णय झाला व्यवस्थापन समितीला दिला आहे. इयत्ता नववी व दहावी आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून, तर इयत्ता सहावी ते नववीचे वर्ग ऑगस्टमध्ये आणि इयत्ता तिसरी व चौथीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. इयत्ता पहिली व दुसरीसंदर्भात मात्र अजूनही निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे, ज्यांच्या शाळा प्रवेशाची सर्वाधिक घाई असते, त्या किंडरगार्टन सुरू करण्याबाबत प्रशासन स्तरावर काहीही उल्लेख केलेला नाही.
कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद; पण शिक्षण सुरु असा आॅनलाईन उपक्रम राज्यस्तरावर राबविला जात आहे. शाळेत मुले नाहीत; मात्र त्यांना डिजिटल अॅपद्वारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
- गजानन लेंडे
प्राचार्य, भातकुली