गाडगे बाबा मंदीर परिसरात लसीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:05 AM2021-05-04T04:05:25+5:302021-05-04T04:05:25+5:30
अमरावती : रहाटगाव, पंचवटी ते विमवी परिसरात सध्या कोरोना लसीकरण केंद्र नाही. प्रत्यक्षात या भागात किमान दोन लाख लोकसंख्या ...
अमरावती : रहाटगाव, पंचवटी ते विमवी परिसरात सध्या कोरोना लसीकरण केंद्र नाही. प्रत्यक्षात या भागात किमान दोन लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब भुयार यांनी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.
महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिक, कोमार्बिड आजार असणारे तसेच १८ वर्षावरील तरुणाईचे लसीकरण सुरू आहे. मात्र, या परिसरात लसीकरण केंद्र नसल्यामुळे जेष्ठ नागरिकांना दूरच्या भागात जाऊन लस घ्यावी लागते. या उन्हाळ्याच्या दिवसांत ज्येष्ठांची परवड होत आहे. सर्वांच्या सोईने व लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी होण्याचे दृष्टीने गाडगेबाबा मंदिर किंवा राधानगर महापालिका शाळा येथे लसीकरण केंद्र सुरू केल्यास सोयीचे होणार असल्याची मागणी बाळासाहेब भुयार यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.