शासकीय रक्तपेढीचे काम तातडीने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:42+5:302021-02-16T04:14:42+5:30
वरूड :- ग्रामीण रुग्णालयामध्ये मंजूर असलेल्या शासकीय रक्तपेढीचे एक वर्षापासून भिजतघोंगडे आहे. याप्रकरणी नाभिक दुकानदार संघटनेने शिक्षण ...
वरूड :- ग्रामीण रुग्णालयामध्ये मंजूर असलेल्या शासकीय रक्तपेढीचे एक वर्षापासून भिजतघोंगडे आहे. याप्रकरणी नाभिक दुकानदार संघटनेने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना वरूड येथे निवेदन दिले. रक्तपेढीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी संघटनेने केली. यावेळी ना. कडू यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून रक्तपेढीचा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.
वरूड येथे शासकीय रक्तपेढी व्हावी म्हणून रक्तदाता संघासह अनेक सेवाभावी संस्थांनी मागणी केली होती. रुग्णाला वेळीच रक्तपुरवठा व्हावा आणि रुग्णांचे प्राण वाचावे, याकरिता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . प्रमोद पोतदार यांनी लोकसहभागातून रक्तदाता संघाची स्थापना केली. यातून शेकडो रक्तदान शिबिराचे आयोजन करून पाच वर्षांत २५ हजार रक्तपिशव्या संकलित करून हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. ही प्रेरणा घेऊन वरूड ग्रामीण रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वी रक्तपेढी मंजूर झाली. परंतु, जागेचा प्रश्न कायम राहिल्याने रक्तपेढीचे काम रखडले. या मुद्द्यावर नाभिक दुकानदार संघटनेने ना. बच्चू कडू यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण शिरूळकर, सचिव प्रवीण सावरकर, राजीव बाभूळकर, अशोक साखरकर व पदाधिकारी उपस्थित होते.