सखी मंच नोंदणीस ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ

By Admin | Published: February 1, 2017 12:12 AM2017-02-01T00:12:55+5:302017-02-01T00:12:55+5:30

महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ..

Starting from February 4 on the Sakhi forum registration | सखी मंच नोंदणीस ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ

सखी मंच नोंदणीस ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ

googlenewsNext

नोंदणी करताच मिळणार हजारोंची आकर्षक बक्षिसे : मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल
अमरावती : महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लोकमत सखी मंचच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्या तीन लाख सदस्यांचे व्यासपीठ मागील सतत १८ वर्षांपासून सुरू आहे.
अमरावती जिल्ह्यात याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सन २०१६ या वर्षांत अमरावती शहरात एकूण ६० पेक्षाही अधिक कौतुक सोहळे, स्नेहमेळावे ऋणानुबंध घट्ट करणारे अनेक उपक्रम घेण्यात आलेत. आवडत्या गोष्टी, आवडते कार्यक्रम, आवडते गिफ्ट यामाध्यमातून सखी मंच परिवार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरवर्षी हजारो महिला या उपक्रमाचा व कार्यक्रमांचा आनंद घेतात. दरवर्षी नवनवीन सदस्य या कुटुंबात सामील होतात. यंदाही या अनोख्या व्यासपीठाची सदस्य नोंदणी अमरावती शहरात ४ व ५ फेब्रुवारी रोजी १३ पेक्षाही अधिक केंद्रांवर सुरू राहणार आहे. सदस्य नोंदणी करताच वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाची पर्वणी तर मिळणारच आहे. पण, त्याशिवाय हजारोंची आकर्षक तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या भरपूर साऱ्या भेटवस्तूदेखील मिळणार आहेत.
यावर्षी नोंदणीसाठी शहरातील १३ केंद्रांवर नोंदणी सुविधा उपलब्ध राहील. सदस्यांना नोंदणीनंतर आकर्षक बक्षिसे दिली जातील. यामध्ये ५४० रूपये किमतीचे फ्राय पॅन, ओळखपत्र, ३१४० रूपयाचे मोफत कुपन, १ लाख रूपये किमतीचे विमा संरक्षण, वाचनीय पुस्तक, गोल्डन धमाका योजना आणि वार्षिक भाग्यवंत सोडत या योजनादेखील लागू होणार आहेत. शिवाय यावर्षी राज्यस्तरावर ५१ महिलांना विमानाद्वारे हवाई सफरीचे भाग्यवंत सोडत काढून लाभ देण्यात येईल.
प्रत्येक सखीला ३,१४० रूपयांचे जे कुपन मिळणार आहेत त्यात २५० रूपयांची शाही दिल्ली दरबार थाली सखींना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोफत, तसेच राजनंदिनी साडीजकडून विशेष उपहार व इतर भरपूर सुविधा महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात १ लाख ५० हजार किमतीची गोल्डन धमाका योजना आराधना साडी सेंटरकडून, नेहमीप्रमाणे विभागीय सोडतीचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. यात १ लाख २५ हजार रूपयांची विविध बक्षिसे असणार आहेत.
सन २०१७ मध्येसुद्धा बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सखींनी विविध स्पर्धा, कार्यशाळा, सांस्कृतिक, साहित्यिक, कलाविष्कार, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी तत्काळ लोकमत भवन येथे ४ व ५ फेब्रुवारीपासून नावनोंदणी करावी. शहरी भागासाठी ५०० रूपये भरून सदस्य नोंदणी करता येईल, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे स्वाती बडगुजर यांच्याशी (९८५०३०४०८७, ९९२२४२७७९४) या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

शहरात येथेही होणार सदस्यता नोंदणी
रोहिणी कुंटे (९४०५४७७३६४), कमिश्नर कॉलनी, कॅम्प
रजनी वानखडे (९६३७०४५०५३), प्रवीणनगर, गणेशपेठ
सरोदे आॅप्टिकल (९६२३६०३८८९), काँग्रेसनगर रोड
अरूणा राऊत (९५२७५५५०७७), गजानन कॉलनी, रंगोली लॉनच्या मागे, कठोरा रोड
अर्चना देशमुख (८३२९५०१०२०), पार्वतीनगर नं. १, अकोली रोड
वैशाली कोटांगळे (९०२१९५७०९०), आनंद विहार कॉलनी, विद्युतनगर
ज्योती नाखले (९४०३०५१५९७), व्यंकटेश कॉलनी, वडाळी
अरूणा इंगोले (९५२७५५५०७७), प्रिया टाऊनशिप, गणपती मंदिराजवळ
मंजू मांजरे - दत्तविहार कॉलनी, सत्कार स्वीटनजीक, अकोली रोड
स्वाती माळोदे (९४२३६२१८४०), बडनेरा बसस्थानकाशेजारी अलंकार पार्क

Web Title: Starting from February 4 on the Sakhi forum registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.