बसस्थानक मार्गावर आॅटोचालकांचे राज्य
By admin | Published: December 2, 2014 10:57 PM2014-12-02T22:57:41+5:302014-12-02T22:57:41+5:30
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मार्गावर दिवसभर एसटीची सतत वाहतूक सुरु असते. येथील प्रवाशी भाडे मिळावे यासाठी आॅटोरिक्षा चालक बसस्थानक मार्गावर वाटेल तिथे आॅटो उभी करतात.
अमरावती : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मार्गावर दिवसभर एसटीची सतत वाहतूक सुरु असते. येथील प्रवाशी भाडे मिळावे यासाठी आॅटोरिक्षा चालक बसस्थानक मार्गावर वाटेल तिथे आॅटो उभी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. येथे वाहतूक पोलीस सेवारत असतानाही वाहतुकीच्या कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे येथे कार्यरत वाहतूक पोलीस करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
शहरात वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे नागरिकांना जिव टांगणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. शहरात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखा कार्यरत आहे. मात्र बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी काही वेळापुरतीच वाहतूक पोलीस कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बसस्थानक मार्गावर सर्वाधिक वाहतूक आढळून येते. त्यावेळी काही तासच वाहतुक शाखेचे पोलीस वाहतुक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असल्याचे आढळून येते. पोलीस व आॅटोरिक्षा चालकांचे हितसंबध निर्माण झाल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रवाशांच्या शोधात आॅटोचालक रस्त्यावर आॅटो उभा करुन प्रवाश्यांच्या शोधात भटकताना आढळून येतात. यात वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.