आपत्ती व्यवस्थापन राज्य संचालकांची अमरावतीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:03 AM2019-08-29T01:03:44+5:302019-08-29T01:04:14+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशीसुद्धा अभय यावलकर यांनी चर्चा केली. आपत्ती उद्भवल्यास त्या त्याठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथक कशा पद्धतीने आपत्तीला हाताळतात, याविषयी त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्य आपत्ती व धोके व्यवस्थापन कार्यक्रमाचे मुंबई येथील संचालक अभय यावलकर यांनी सोमवारी अमरावती येथे भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तींविषयी चर्चा केली
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशीसुद्धा अभय यावलकर यांनी चर्चा केली. आपत्ती उद्भवल्यास त्या त्याठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथक कशा पद्धतीने आपत्तीला हाताळतात, याविषयी त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र रामेकर यांनी जिल्हा शोध बचाव पथकांमध्ये सर्व प्रशिक्षित कर्मचारी असल्याची माहिती दिली. सर्व शोध व बचाव पथकातील कर्मचारी प्रशिक्षित असून, आपत्ती हाताळण्याचा अनुभव चांगल्या प्रकारचा असल्याबाबत त्यांना सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन टीम अलर्ट असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन ट्रक तैनात आहेत तसेच अमरावती जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाविषयी क्षमता बांधणी कार्यक्रम प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम तसेच शाळा सुरक्षा कार्यक्रम महाविद्यालयीन स्तरावर एनएसएच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असल्याबाबत अवगत करण्यात आले. संचालकांनी सर्व साहित्याची पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कायार्बाबत समाधान व्यक्त केले.