राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ५ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 07:34 PM2023-12-22T19:34:00+5:302023-12-22T19:34:50+5:30
अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
मनीष तसरे, अमरावती: राज्य उत्पादन शुल्क, अमरावतीव्दारे विशेष मोहिमेंतर्गत हातभट्टी दारु वाहतूक व मोहा फुलांची अवैध वाहतुक प्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत हातभट्टी दारु व मोहाची फुले गोण्यासह ५ लक्ष ६१ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदानुसार गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक यांनी दिली.
आगामी नाताळ सण, नविन वर्षाच्या पार्श्वभुमीवर तसेच बहिरम यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने गावठी हातभट्टी दारु निर्मीती, विक्री, वाहतुक संदर्भात विशेष मोहिमेंतर्गत मध्यप्रदेश सीमालगत भागात गस्त घालून हि कारवाही करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क, अमरावती विभागाचे विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ, व अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदशनाखाली राबविण्यात आली.