राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:10 PM2018-10-06T23:10:09+5:302018-10-06T23:10:30+5:30

शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह आहे. अशातच चार जणांच्या मृत्यूस जबाबदार महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाकडे बडनेरा येथील सिद्धार्थ बनसोड यांनी केली.

State Human Rights Commission | राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद

राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद

Next
ठळक मुद्देडेंग्यूबळी : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, तीन ठाण्यांमध्ये तक्रारी

श्यामकांत सहस्त्रभोजने।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह आहे. अशातच चार जणांच्या मृत्यूस जबाबदार महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाकडे बडनेरा येथील सिद्धार्थ बनसोड यांनी केली.
तब्बल तीन महिन्यांपासून डेंग्यूने जिल्ह्यात लोक हैराण झाले आहेत. अमरावती शहरात सुमीत श्रीकृष्ण गोटेफोडे, मेघा वानखडे, शेख फारुख शेख छोटू, नितीन बगेकर या चौघांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांचे जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेणाºया महापालिकेचे आरोग्य व स्वच्छता विभागाशी संबंधित अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत मिळवून घ्यावी, असे सिद्धार्थ बनसोड यांनी तक्रारीत नमूद केले. डेंग्यूने झालेल्या मृत्यूप्रकरणी तीन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झालेल्या आहेत.
‘लोकमत’चे कात्रण जोडून तक्रार दाखल
महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे सदर चार जणांचा मृत्यू झाला आहे. ‘लोकमत’ने डेंग्यू व इतर साथरोगांची दखल घेत तीन महिन्यांपासून वृत्त प्रकाशित केले. प्रकरणाची अधिक माहिती मिळण्यासाठी या बातम्यांचे कात्रण जोडले आहे. या अतिसंवेदनशील विषयांच्या अनुषंगाने संबंधित अधिकाºयांवर चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, असे तक्रारीत सिद्धार्थ बनसोड यांनी म्हटले.

Web Title: State Human Rights Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.