राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा : मुंबई, अमरावती संघाने गाजवला तिसरा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 08:01 PM2017-12-24T20:01:56+5:302017-12-24T20:02:16+5:30
अभ्यासा स्पोर्ट अॅकेडमी व जे.डी.पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने अभ्यासा स्कूल रेवसा येथे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत तब्बल १२ संघामध्ये तिस-या दिवशी लढत झाली.
अमरावती - अभ्यासा स्पोर्ट अॅकेडमी व जे.डी.पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने अभ्यासा स्कूल रेवसा येथे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत तब्बल १२ संघामध्ये तिस-या दिवशी लढत झाली. अमरावती व मुंबई संघाने रोमहर्षक क्षेत्ररण करून क्रीडाप्रेमींच्या डोळ्याची पारणे फेडली.
के.सी.गांधी स्कूल मुंबई व फुटबॉल क्लब भुसावळमध्ये रंगलेल्या सामन्यात ट्रायब्रेकर मध्ये मुंबई संघाने ३-२ ने विजयी मिळविला, तर अभ्यासा स्पोटर्स अॅकेडमीने सातार संघाला ३-० ने धूळ चारली व एकतर्फी विजय संपदान केला. डीसीसी अकोला व बीडीसी चंद्रपूरमध्ये रंगलेल्या सामन्यात अकोला संघाने ३-० ने विजय मिळविला. एम.एम. रब्बानी हायस्कूल कामठीने अभ्यासा फुटबॉल संघावर ५-० ने एकतर्फी विजय मिळविला. चैतन्य स्पोर्ट दारव्हाविरूद्ध एंजल फुटबॉल अॅकेडमीमध्ये रंगलेल्या सामन्यात एंजल अॅकेडमीने ४-० ने विजय संपादन केला. रविवारचा शेवटचा सामना के.सी. गांधी स्कूल मुंबई व अभ्यासामध्ये चांगलाच रंगला. यामध्ये अभ्यासाच्या खेळाडूंनी मुंबईवर ५-१ ने विजय संपदान करून एकतर्फी बाजी मारली. सोमवारी उपांत्य फेरीत एंजल फुटबॉल अॅकेडमी अमरावती, जिल्हा क्रीडा अकोला, रब्बानी हायस्कूल कामठी, अभ्यासा स्पोर्ट्स अॅकेडमी यांच्यात रंगणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना होईल. हा सामना बघण्यासाठी क्रीडाप्रेमींची गर्दी होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाला आमदार यशोमती ठाकूर यांची उपस्थिती राहणार असल्याचे अॅकेडमीचे अध्यक्ष कुलदीप गावंडे यांनी सांगितले.