विद्याभारती महाविद्यालयात राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:07 PM2017-11-25T23:07:44+5:302017-11-25T23:24:55+5:30
विद्याभारती कॉलेज आॅफ फार्मसी व इंडियन फार्मास्यूटिकल्स असोसिएशनच्या अमरावती शाखेच्यावतीने राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.
ऑनलाईन लोकमत
अमरावती : विद्याभारती कॉलेज आॅफ फार्मसी व इंडियन फार्मास्यूटिकल्स असोसिएशनच्या अमरावती शाखेच्यावतीने राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले. अध्यक्षस्थानी इंडियन फार्मास्यूटिकल्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एस.ए. हसन होते. असिस्टंट डायरेक्टर एम.ए.अली प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यातील २४ महाविद्यालयांतील १६० विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविला असून, त्यांनी नवीन अभ्यासक्रमातील विविध प्रकारचा संदेश देणारे पोस्टर या ठिकाणी प्रदर्शनामध्ये लावल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य के.के. टापर यांनी याप्रसंगी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले एच.एस. हसन म्हणाले की, गेल्या २० वर्षात औषध निर्माणशास्त्राचा अभ्यासक्रम बदललेला नाही. परंतु, जगात अनेक प्रकारचे नवीन संशोधन झाले असून, अशा प्रकारच्या प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळते. प्रास्ताविक प्राचार्य टापर यांनी केले. भारतामध्ये औषध निर्माणशास्त्राचा सप्ताह सुरू आहे. यानिमित्त सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे, असेही प्राचार्य टापर यावेळी म्हणाले. यावेळी चोरडीया यांनी मधुमेह या भारतात सर्वाधिक भेडसावणाºया आजारासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यभरातून आलेले २४ महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक आदी उपस्थित होते.