विद्यानिकेतनच्या दोन विद्यार्थिनींसह तिघांची राज्यस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 02:50 PM2019-11-09T14:50:55+5:302019-11-09T14:51:07+5:30
स्थानिक विद्यानिकेतन व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यां
कुऱ्हा/परतवाडा (अमरावती) - स्थानिक विद्यानिकेतन व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी यवतमाळ येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत यश मिळविले.
विद्यानिकेतन विद्यालयाची इयत्ता बारावीची विद्यार्थिनी भुवनेश्वरी रवींद्र तिरमारे हिने तीन हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत विभागीय पातळीवर यश मिळविले. तिची १९ वर्षे वयोगटात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच विद्यालयाची कस्तुरी प्रशांत देशमुख या विद्यार्थिनीने १७ वर्षे वयोगटात विभागीय स्पर्धेत भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तिचीदेखील राज्यस्तरावर निवड झाली आहे. विद्यालयाचे पालक संचालक प्रकाश मक्रमपुरे, मुख्याध्यापक कन्नाके, शिक्षक सोहळे, शिगरवाडे, कुऱ्हेकर, भक्ते, शिंगाणे, सुने, सावरकर, परतेकी, तेटू, पठाण, दळवे, देशमुख, काळे, सोनोने, जगताप, शिरसाठ, यावले, सुनील धांदे यांनी अभिनंदन केले.
रजत झंवर लांब उडीत अव्वल
अचलपूरच्या राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी रजत संजय झंवर याने विभागीय स्पर्धेत सहभागी होऊन लांब उडी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याची १९ वर्षे वयोगटात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. रजतने ६.५५ मीटर लांब उडी घेतली. संस्थेचे अध्यक्ष संजय चौधरी, सचिव अनिल चौधरी, प्राचार्य पी.एस. नैकेले, उपमुख्याध्यापक एस.डी. झंवर, पर्यवेक्षक ममता तिवारी आदींनी त्याच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.