राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : लांब उडी स्पर्धेत अमरावतीच्या पल्लवीला सुवर्ण, जलतरणात अमित गोरे द्वितीय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 05:50 PM2018-01-16T17:50:08+5:302018-01-16T17:50:30+5:30
नवी मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती पोलीस विभागात कार्यरत पल्लवी गणेश या खेळाडूने लांब उडीत सुवर्णपदक पटकाविले. जलतरण स्पर्धेत अमित गोरेने द्वितीय क्रमांक पटकावला.
अमरावती - नवी मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती पोलीस विभागात कार्यरत पल्लवी गणेश या खेळाडूने लांब उडीत सुवर्णपदक पटकाविले. जलतरण स्पर्धेत अमित गोरेने द्वितीय क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ६ ते १२ जानेवारी दरम्यान नवी मुंबईत पार पडली. यामध्ये पल्लवी गणेश हिने लांब उडीत प्रावीण्य प्राप्त करून सुवर्णपदक मिळविले. जलतरण स्पर्धेत अमित गोरे याने द्वितीय, वैभव पत्रे याने तृतीय स्थान पटकावले. वैभव पत्रे, कैलास ठाकरे, सागर सरदार यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. फुटबॉल स्पर्धेत कफील अहमद याने तृतीय क्रमांक पटकावून चॅम्पियनशिप मिळविली. अमोल नेवारे, मुसाईद खान, निखिल सहारे, इसरार अहमद, महेश शर्मा, हर्षद जळमकर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. हॉकी स्पर्धेत धीरज जोग यांनी चतुर्थ क्रमांक पटकावून चॅम्पियनशिप मिळविली, तर मलीक अहमद, नईम बेग, मोहम्मद आबीद यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. याव्यतिरिक्त अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, कबड्डी, हँडबॉलसह अन्य स्पर्धांमध्ये अमरावती शहरातून ३२ खेळाडू सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात खेळाडंूनी हे यश मिळविले.