राज्य पर्यटन महामंडळ नावाचेच

By admin | Published: February 23, 2016 12:02 AM2016-02-23T00:02:51+5:302016-02-23T00:02:51+5:30

महाराष्ट्र राज्य पर्यटक नव्हे ‘विध्वंसक’ महामंडळ असून येणाऱ्या पर्यटकांसाठी साधा स्वागत कक्ष उघडण्यात आले नाही.

State tourism corporation name | राज्य पर्यटन महामंडळ नावाचेच

राज्य पर्यटन महामंडळ नावाचेच

Next

समिती प्रमुखांचा संताप : विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार
चिखलदरा : महाराष्ट्र राज्य पर्यटक नव्हे ‘विध्वंसक’ महामंडळ असून येणाऱ्या पर्यटकांसाठी साधा स्वागत कक्ष उघडण्यात आले नाही. तर माहिती सुद्धा नाही, त्यावरही कळस म्हणजे आयोजित बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहू नये, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आगामी विधानसभा सत्रात हा प्रश्न मांडणार असल्याचे समिती प्रमुख सुनील देशमुख यांनी सांगितले.
एम.टीडीसी बद्दल आगपाखड असतांना चिखलदरा विकासासंदर्भात आयोजित सिडकोचा आढावा सोमवारी दुपारी ३ वाजता सार्वजनिक उपक्रम समितीने घेतला. विदर्भ व मराठवाडा मिळून एकमेव चिखलदरा पर्यटनस्थळ असताना राज्य पर्यटन विकास महामंडळाचा बेतूक व बेजाबदारपणा दिसून येत असल्याचे संतापजनक मत सोमवारी येथे समितीच्या संतप्त सदस्यांनी नोंदविले. समितीप्रमुख आ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकुर, आ. अब्दुल सत्तार अब्दुल, आ. अमित परेब, हनुमंत डोळस, सिडकोचे केंद्रेकर, रेंणे आदि विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. चिखलदरा पर्यटन स्थळाच्या विकासासंदर्भात महाराष्ट्र शहर व औद्योगिक महामंडळ (सिडकोची) स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचशे कोेठी रुपयांचा वरील टप्पा मंजूर केल्यावर त्या संदर्भात मंगळवारी पहिली बैठक येथे पार पडली. सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर, सचिव माहिती उपस्थित समिती पुढे मांडली.यावर विकासात्मक दृष्टा चर्चा करुन आणखी काय करता येईल याबाबत चर्चा झाल्याचे आ. सुनील देशमुख यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केल्यावर त्याचा कामाचा आढावा सदस्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सिडकोच्या कार्याची माहिती घेण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. राज्याच्या पर्यटन विभागाकडून येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत असेल तर हे पर्यटक विकास महामंडळ नसून ‘विध्वंसक मंडळ’ असल्याचे संतप्त मत पर्यटन विकास महामंडळाबद्दल समिती प्रमुखासह सर्व आमदारांनी नोंदविले.

पर्यटक विकास महामंडळाने निराशा केली असून मुद्दा विधानसभेत मांडू. सिडको संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. चिखलदरा विकास आता कश्या पद्धतीने व्हावा यासाठीच आढावा होता.
- आमदार सुनील देशमुख
सार्वजनिक उपक्रम समिती प्रमुख

Web Title: State tourism corporation name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.