प्रहार नगरसेवकांचे मुख्याधिकारी कक्षात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:07 AM2018-07-27T01:07:29+5:302018-07-27T01:08:06+5:30

अचलपूर नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध प्रहारच्या नगरसेवकांनी गुरुवारी सकाळी १० पासून मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.

Static agitation in the district headquarters of Prahar Councilors | प्रहार नगरसेवकांचे मुख्याधिकारी कक्षात ठिय्या आंदोलन

प्रहार नगरसेवकांचे मुख्याधिकारी कक्षात ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देविविध मागण्यांचे निवेदन : बांधकाम विभागाला लावले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध प्रहारच्या नगरसेवकांनी गुरुवारी सकाळी १० पासून मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.
सभापती संजय तट्टे, संजय तट्टे, प्रवीण पाटील, विजया थावानी, बंटी ककराणीया, शरद राठी, किरण मालू, बंटी उपाध्याय आदी नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या कक्षात आंदोलन केले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई, अमृत योजनेत विकासकामांची चौकशी, सीसीटीव्ही, सफाई कंत्राटदारावर कारवाई, खड्डेमुक्त रस्ते, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकाºयांवर कारवाई, आठवडी बाजारप्रकरणी दोषी अधिकाºयांवर फौजदारी आदी मागण्या मांडण्यात आल्या. मुख्याधिकारी जगताप कक्षात सायंकाळी ४ वाजता हजर झाल्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बांधकाम सभापतींनी ठोकले टाळे
अचलपूर नगरपालिकेतील प्रहारचे बांधकाम सभापती संजय तट्टे यांनी विविध कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईचा निषेध करीत, बांधकाम विभागाला कुलूप ठोकले. यामुळे कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, काही वेळानंतर कुलूप उघडण्यात आल्याने तणाव निवळला. यानंतर मुख्याधिकारी कक्षात त्यांनी सहकारी नगरसेवकांसोबत ठिय्या आंदोलन सुरू केले.

Web Title: Static agitation in the district headquarters of Prahar Councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप