तृतीयपंथी अडकले विवाहबंधनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:14 AM2018-07-06T01:14:30+5:302018-07-06T01:15:07+5:30

अमरावती शहरातील एका मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री ८ वाजता दोन तृतीयपंथीय विवाहबंधनात अडकले. या अनोख्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. लग्नाकरिता राज्यभरातून तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती.

The stereotypical married couple! | तृतीयपंथी अडकले विवाहबंधनात!

तृतीयपंथी अडकले विवाहबंधनात!

googlenewsNext
ठळक मुद्देशुभमंगल : राज्यभरातील तृतीयपंथी अमरावतीत

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती शहरातील एका मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री ८ वाजता दोन तृतीयपंथीय विवाहबंधनात अडकले. या अनोख्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. लग्नाकरिता राज्यभरातून तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती.
शहरातील तृतीयपंथीयाचे नाशिक जिल्ह्यातील मनमाड तालुक्यातील नांदगावच्या तृतीयपंथियाशी विवाह सोहळा पार पडला. तत्पूर्वी प्रथेनुसार देवी रेणुका यल्लम्मा यांच्याशी विवाह लावण्यात आला. या लग्नासाठी पुणे, मुंबई, चाळीसगाव नागपूर, अमरावती तसेच खंडवा येथील तृतीयपंथीयांनी उपस्थिती दर्शविली.
दरम्यान, बुधवारी वधूला हळद लागली, तर गुरुवारी डोलीतून मिरवणूक काढून तिला विवाहस्थळी आणण्यात आले. यावेळी नृत्याने जल्लोषात भर पडली. लग्न वºहाडींच्या जेवणावळीही उठल्या. तृतीयपंथीयांचा विवाह सोहळा अमरावतीकरांसाठी नावीन्याचा विषय असला तरी असे विवाह यापूर्वीही लागले आहेत, असे उपस्थितांनी सांगितले.

Web Title: The stereotypical married couple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न