बँक खातेदाराच्या मागे उभे राहून चोरला डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:58 PM2017-11-12T22:58:23+5:302017-11-12T22:58:47+5:30

सायबर गुन्हेगारांनी शहरातील निवडक एटीएमला लक्ष्य केले आहे. एटीएममधून पैसे काढणाºयांमागे उभे राहून डाटा चोरला जात आहे.

Stolen data standing behind the bank account holder | बँक खातेदाराच्या मागे उभे राहून चोरला डाटा

बँक खातेदाराच्या मागे उभे राहून चोरला डाटा

Next
ठळक मुद्देसायबर सेल प्राथमिक तपास पूर्ण : आता केवळ आरोपींची शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सायबर गुन्हेगारांनी शहरातील निवडक एटीएमला लक्ष्य केले आहे. एटीएममधून पैसे काढणाºयांमागे उभे राहून डाटा चोरला जात आहे. हा स्किमिंगचाच प्रकार असून पुण्यातील अटक झालेल्या आरोपींनीदेखील हाच फंडा वापरून एटीएम क्लोन करून खातेदारांचे पैसे काढल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.
शहरातील स्टेट बँकेच्या तीन एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी हा डाटा मे महिन्यात चोरला होता. त्याआधारे एटीएम क्लोन करून आता पैसे चोरले जात आहे. सायबर सेलने शहरातील एटीएम सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये काही संशयित आढळून आलेत. त्यांनीच स्किमिंग केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांचा प्राथमिक तपास आता पूर्ण झाला असून त्यामध्ये काही आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
आता त्या आरोपींचा शोध सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या अनेक खातेदारांच्या एटीएमची माहिती सायबर गुन्हेगारांनी चोरली असून त्यांच्याही खात्यातून पैसे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसबीआयच्या खातेदारांनी पिन बदलवून घेणे अत्यावश्यक झाले आहे.
यासंदर्भात बँकेकडूनही आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २० बॅक खातेधारांच्या खात्यातून रक्कम चोरून परस्पर पैसे काढण्यात आले. गुडगाव, आसाम, हरियाणा, नोएडा येथून ही रक्कम विड्रॉल करण्यात आली आहे. अमरावतीच्या एटीएममधून माहिती चोरणारे व गुडगाव, आसाममधून विड्रॉल करणारे हे गुन्हेगार सीसीटीव्हीत कैद असून त्यांची शोधमोहीम आता लवकरच पूर्णत्वाकडे येण्याचे संकेत सायबर सेलने दिले आहे.
एसबीआयच्या आणखी एका खातेदाराचे २० हजार उडविले
तेलीपुºयातील रहिवासी विनोद नारायण गद्रे (४०) शनिवारी नवीवस्तीतील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यांनी एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकताच त्यांना आधार कार्ड क्रमांक लिंक करण्यासंबंधित सूचना मिळाली. त्यामुळे त्यांनी एटीएम कार्ड बाहेर काढले आणि एक्सीस बँकेच्या एटीएममध्ये जाऊन १० हजारांची रक्कम काढली. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या मोबाइलवर एसबीआयमधून २० हजार रुपये काढल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यांनी एसबीआय शाखेशी संपर्क केला आणि त्यानंतर बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारोडकर यांनी केला.

Web Title: Stolen data standing behind the bank account holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.