राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट; १५ महिला मजूर वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 10:00 PM2020-12-09T22:00:56+5:302020-12-09T22:01:14+5:30

नांदगाव पेठ येथे सोफिया कंपनीत तिवसा येथील महिला दररोज कामाला जातात.

Stomach taken by car on national highway; 15 women laborers survived | राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट; १५ महिला मजूर वाचले

राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट; १५ महिला मजूर वाचले

googlenewsNext

तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शेंदोळा खुर्दनजीक चारचाकी वाहनाने रात्री ८ वाजता पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच वाहनातून उतरविल्याने १४ महिला मजूर वाचल्या. वाहन जळून खाक झाले.

नांदगाव पेठ येथे सोफिया कंपनीत तिवसा येथील महिला दररोज कामाला जातात. त्यापैकी १४ जणी चारचाकीने घरी परत येत असताना वाहनाने पेट घेतला, धूर दिसताच चालकाने तात्काळ सर्व महिलांना उतरवले. त्यामुळे या घटनेत कोणालाही इजा पोहोचली नाही, तिवसा येथील अग्निशमन दलाचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच पाण्याचा मारा करून आग विझविली. मात्र, तोपर्यंत वाहन मोठ्या प्रमाणावर जळाले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली, तिवसा पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी घटनास्थळी दाखल होऊन यावर नियंत्रण मिळविले

Web Title: Stomach taken by car on national highway; 15 women laborers survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.