नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 08:22 AM2024-10-05T08:22:30+5:302024-10-05T08:23:22+5:30
मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे व पोलीस स्टेशनचे नुकसान
मनीष तसरे
अमरावती : गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जमाव नागपूर गेट पोलीस स्टेशनवर आलेला होता, काही वेळात हा जमाव हिंसक झाला व अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर व हजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. यात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे व पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झालेले आहे.
दोन ते अडीच हजार लोकांचा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना रात्री अखेर हवेत गोळीबार अश्रुधुरांच्या नळकांड्यावर लाठीचार्ज करावा लागला. रात्री एक वाजता नंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झालेले आहेत. या परिसरात सध्या जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याच्या आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.