छत्रपतींच्या स्मृतिदिनाचा घोळ थांबवा

By admin | Published: April 8, 2017 12:13 AM2017-04-08T00:13:38+5:302017-04-08T00:13:38+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन ३ एप्रिल रोजी असताना ११ एप्रिल रोजी रायगडवर तो साजरा करण्याचा घाट शासनाने रचला आहे.

Stop the chanting of Chhatrapati Chatterjee | छत्रपतींच्या स्मृतिदिनाचा घोळ थांबवा

छत्रपतींच्या स्मृतिदिनाचा घोळ थांबवा

Next

संभाजी ब्रिगेडची मागणी : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन ३ एप्रिल रोजी असताना ११ एप्रिल रोजी रायगडवर तो साजरा करण्याचा घाट शासनाने रचला आहे. हा घोळ थांबवून तिथी व धर्माच्या विळख्यात शिवरायांना अडकवू नये व हा घोळ थांबवावा या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडद्वारा अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना सादर केले.
स्मृतिदिन हा शांततेत व शिवरायांच्या स्मृतिला अभिवादन करीत ३ एप्रिल या जगमान्य इंग्रजी तारखेला साजरा करायला पाहिजे. जन्मदिवस इंग्रजी तारखेनुसार व स्मृतिदिन तिथीनुसार असा खेळ करू नये, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी विभागीय अध्यक्ष विनोद होगोणे, जिल्हाध्यक्ष तुषार देशमुख, प्रेमकुमार बोके, सोपान साबळे, महानगर अध्यक्ष अजिंक्य काळे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद काळे, आदित्य देशमुख, शुभम शेरकर, सत्यजित देशमुख, गणेश गायकवाड, निखिल काटोलकर, रिद्धेश ठाकरे, समीर नांदूरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Stop the chanting of Chhatrapati Chatterjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.