रासायनिक खाताचा दरवाढ थांबवा, अन्यथा राज्यभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:20+5:302021-05-20T04:13:20+5:30

अंजनगाव सुर्जी : रासायनिक खतांच्या किमतीत प्रतिबॅग ४० ते ५० टक्क्यांची होणारी दरवाढ थांबवा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलनाचा ...

Stop chemical account price hikes, otherwise statewide agitation | रासायनिक खाताचा दरवाढ थांबवा, अन्यथा राज्यभर आंदोलन

रासायनिक खाताचा दरवाढ थांबवा, अन्यथा राज्यभर आंदोलन

Next

अंजनगाव सुर्जी : रासायनिक खतांच्या किमतीत प्रतिबॅग ४० ते ५० टक्क्यांची होणारी दरवाढ थांबवा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलनाचा पवित्रा घेईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने तहसीलदारांना दिला बुधवारी निवेदनाद्वारे दिला.

शेतीचा बहुतांश खर्च हा रासायनिक खत, बी-बियाणे, फवारणी औषधे यावर होत असतो. शेतमालाला योग्य भाव नसल्याने हा खर्च अवाढव्य भासतो. कारण हाती काहीच शिल्लक नसते. त्यातच केंद्र सरकारने रासायनिक खताची भाववाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने रासायनिक खताची दरवाढ मागे न घेतल्यास संभाजी बिग्रेडच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान साबळे, तालुकाध्यक्ष शरद कडू, तालुका सचिव प्रवीणकूमार बोके, उमेश काकड उपस्थित होते.

Web Title: Stop chemical account price hikes, otherwise statewide agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.