विदर्भातील मेंढपाळांचे विस्थापन थांबवा
By admin | Published: November 25, 2014 10:48 PM2014-11-25T22:48:36+5:302014-11-25T22:48:36+5:30
विदर्भ व मराठवाड्यात सातत्यपुर्ण दुष्काळाने चाऱ्यापाण्याअभावी मेंढपाळ व पशुपालक जमातींचे सर्वदूर होत असलेले विस्थापन थांबवूून उपाययोजना कराव्या या मागण्यासाठी मावळा संघटनेच्या
मोर्शी : विदर्भ व मराठवाड्यात सातत्यपुर्ण दुष्काळाने चाऱ्यापाण्याअभावी मेंढपाळ व पशुपालक जमातींचे सर्वदूर होत असलेले विस्थापन थांबवूून उपाययोजना कराव्या या मागण्यासाठी मावळा संघटनेच्या वतीने मोर्शी उपविभागीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
केवळ राजकीय उद्येशपुर्तीसाठी धनगर आरक्षणाची मागणी नसून गेल्या १०६० सालापासून असलेल्या राज्यघटनात्मक अधिकारांची पायमल्ली आजवरच्या राज्यातील सरकारने केली आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणामुळे प्रगतीपथावर जावू शकणाऱ्या धनगर व तत्सम जातींना ५० वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या केंद्र व राज्य स्तरावरील आजवरच्या राजकीय सत्ताधिशांचा तीव्र निषेध यावेळी उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला. तसेच भारतीय जनता पक्ष व शिवसेना या दोन राजकीय सत्ताधारी पक्षांनी संसद व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धनगर व वंचित जमातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन राज्यातील विविध निवडणुक सभांमधून देण्यात आल्याने या पक्षांना मोठ्या प्रमाणात मतदान होवून सभागृहात पाठविण्यामध्ये सिंंहाचा वाटा उचलला आहे.
निवेदन सादर करतांना मावळा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कोराटे, सचिन मुंदाने, चिमाजी कोकाटे, संगीता ढोके, रवींद्र कोकरे, सरपंच चरणदास लांडे, मंगेश बोकडे, सोनाजी हटकर, शिवा हटकर, पांडुरंग आयनर, माधव उडाळ, रवींद्र तालन, सुभाष बरडे आदींची उपस्थिती होती.