मोबाईल कंपन्यांचे शहरातील खोदकाम थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:16 PM2018-12-05T22:16:06+5:302018-12-05T22:16:33+5:30
शहरात विविध मोबाईल कंपन्यांद्वारा अनेक ठिकाणी अवैध टॉवरची उभारणी करण्यात आली. अनेक ठिकाणी नियमबाह्यरीत्या खोदकाम करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याची गंभीर दखल घेऊन ही नियमबाह्य कामे त्वरित थांबविण्याची मागणी युवा स्वाभिमानद्वारा महापालिका आयुक्तांना बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात विविध मोबाईल कंपन्यांद्वारा अनेक ठिकाणी अवैध टॉवरची उभारणी करण्यात आली. अनेक ठिकाणी नियमबाह्यरीत्या खोदकाम करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याची गंभीर दखल घेऊन ही नियमबाह्य कामे त्वरित थांबविण्याची मागणी युवा स्वाभिमानद्वारा महापालिका आयुक्तांना बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मोबाईल कंपन्यांद्वारा शहरात अनेक नागरिकांच्या घरांवर टॉवर उभारलेले आहेत. या टॉवरच्या ध्वनीलहरींमुळे नागरिकांना ध्वनीप्रदूषणासह विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. विशेष: वृद्ध व लहान मुलांना आजाराचा त्रास वाढत आहे. यासोबतच मोबाईल कंपन्यांना शहरात खोदकामाची परवानगी मिळाली असली तरी या कंपन्यांद्वारा या परवानगीचा गैरवापर करून नियमबाह्यरीत्या खोदकाम करीत आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष: पायी चालणाऱ्या शेतकºयांना त्रास होत आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांवर दोन दिवसांत कारवाई करावी, अशी मागणी युवा स्वाभिमानद्वारा महापालिका आयुक्तांना करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नीलेश भेंडे, गुर्जन गिरेवाल, सुमित बोराळे, आशिष तायडे, राहुल भुयार, स्वप्निल निंदाणे, विशाल बाबर आदी उपस्थित होते.
गर्भवती माता मृत्यूप्रकरणी डॉक्टरवर कारवाई करा
जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी तिवसा तालुक्यातील राजकन्या विनोद रताळे या गर्भवती मातेचा मृत्यू झाला. डॉक्टर वेळेवर न पोहोचल्यामुळेच या महिलेला जीव गमवावा लागल्याचा आरोप युवा स्वाभिमान पार्टीने केला आहे. याप्रकरणी सखोल चौकषी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी ज्योती सैरीसे, संगीता ठाकरे, मोहिनी चव्हाण, सुमन कैथवास, लता अंबुलकर, चंदा लाडे, संगीता काळबांडे, अरूणा चचाणे, सीमा पाखरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.