उडीद व कडधान्याची आयात थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:39+5:302021-05-21T04:14:39+5:30

मोर्शी : शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना उडीद व कडधान्याची आयात परप्रांतात मोठ्या प्रमाणात होत आहे. संपूर्ण ...

Stop import of urad and pulses | उडीद व कडधान्याची आयात थांबवावी

उडीद व कडधान्याची आयात थांबवावी

Next

मोर्शी : शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना उडीद व कडधान्याची आयात परप्रांतात मोठ्या प्रमाणात होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचे संकट सुरू असताना केंद्र सरकारकडून वाढविण्यात आलेल्या रासायनिक खताच्या किमती त्वरित कमी करण्यात याव्या. तद्वतच उडीद या कडधान्याची आयात त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी थाली बजाओ आंदोलन करण्यात आले.

रासायनिक खताची केलेली भाववाढ पूर्णतः मागे घ्यावी व कोविड महामारीमुळे या देशात आलेली विपरीत परिस्थिती लक्षात घेऊन कुठलीही रासायनिक व मिश्रखताची भाववाढ करू नये. जेणेकरून शेतकऱ्यांवर कुठलाही नवीन भार पडणार नाही. मागील वर्षी असलेल्या किमतीमध्येच राज्याच्या केलेल्या मागणीनुसार वेळेवर साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल खांडेकर, नगरसेवक नईमखान, रसिक ठाकरे, रवी परतेती, फैजअहमद, राजा शेख, संदेश नवरे इत्यादींनी केली आहे.

Web Title: Stop import of urad and pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.